साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या लेकीने शांताबाईनीं वयाच्या ९० व्या वर्षी दि.४ मे २०२५ रोजी वृद्धापकाळाने बोरीवली मुंबई सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. जग बदल घालून घाव मज सांगून गेले “भीमराव “अण्णाभाऊ साठे यांनी पहिली वाहिली ‘फकिरा’ कादंबरी संविधान शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला समर्पित केली.इसवी सन १९५८ ला घाटकोपर चीरानगर झोपडपट्टीत सतत तीन महिने लिहीताना अण्णाभाऊ आजारी पडले.तेव्हा त्यांना याच लेकीने सावरले.फकिराची साक्षीदार शांताबाई साठे.! पुढे त्यांनी “लाल बावटा” कलापथकात सहभाग नोंदवताना शाहिर अमर शेख, गंगाराम गवाणकर यांच्या सोबत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तुरुंगवास भोगला.शांताबाई साठे यांच्या स्मृती आमच्या सारख्यां साहित्यीक पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यानां स्मरणात राहतील. आईसाहेब भावपूर्ण अभिवादन.!
@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन सोशल मीडिया ठाणे जिल्हा ग्रामीण+९३२४३६६७०९
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती