भाटशिरपूरा – गावातील जेष्ठ नागरिक जिजाबाई लिंबराज आबा गायकवाड यांचे दिनांक ५ मे २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.मात्र त्यांच्या कुटुंबियांनी पारंपरिक विधींना एका सकारात्मक वळणावर नेत, समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. जिजाबाई यांच्या रक्षेचे पारंपरिक नदी विसर्जन न करता,त्यांच्या कुटुंबियांनी रक्षेतून वृक्षांची लागवड केली.राखेचा उपयोग खत म्हणून करत विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. मृत्यूच्या दुःखद प्रसंगालाही त्यांनी जीवनदायिनी हरित चळवळीचे स्वरूप दिले. हे वृक्ष आता केवळ जिजाबाईंच्या स्मृतीरूपात उभे राहत नाहीत तर पर्यावरण संवर्धनाचा एक सशक्त संदेशही देत आहेत. आजच्या काळात जिथे प्रदूषण आणि वृक्षतोडीची समस्या गंभीर बनत आहे,तिथे गायकवाड कुटुंबियांचा हा निर्णय एक आदर्श सामाजिक संदेश देतो — “मृत्यूनंतरही निसर्गासाठी काहीतरी चांगले करून जाता येते.” या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून,अनेकांनी ही संकल्पना आत्मसात करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जिजाबाई गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लावलेले हे वृक्ष भविष्यात हरित श्रद्धांजलीचे प्रतीक ठरतील,यात शंका नाही.या अनोख्या उपक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांनी उचललेल्या या पावलाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन