धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.05 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 321 कारवाया करुन 2,55,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे:आरोपी –श्रीकांत चंद्रकांत लगाडे, वय 19 वर्षे, रा.आदर्शनगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.05.05.2025 रोजी 14.20वा. सु.वाशी येथल पारा चौकाचे बाजूला अंदाजे 1,600 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी –जावेद जाफर पठाण, वय 50वर्षे, रा.मंगरुळ ता. कळंब जि. धाराशिव हे दि.05.05.2025 रोजी 15.40 वा. सु.ढोकी ते कळंब जाणारे रोडवर मंगरुळ शिवारात जवळा पाटी येथे अंदाजे 700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.05.05.2025 रोजी 14.15 वा. सु. नळदुर्ग पो ठाणे हद्दीत नळदुर्ग शिवारातील अक्कलकोट रोडवरील गणपती मंदीराचे समोरील शेतात छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-शहेबाज रहीम सय्यद, वय 34 वर्षे, रा. रहीम नगररसुलसाब गरीबसाब शहा वय 46 वर्षे, रा. बाझार लाईन किलृला नळदुर्ग मुक्तार फकीर अहेमद नदाफ वय 29 वर्षे, रा. हत्ती गल्ली नळदुर्ग हे 14.15 वा.सु. नळदुर्ग शिवारातील अक्कलकोट रोडवरील गणपती मंदीराचे समोरील शेतात तिरट जुगाराचे साहित्यासह एकुण 1,360 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले नळदुर्ग पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-कलिम महेबुब तांबोळी, वय 29 वर्षे, रा. लोहारा बु. ता. लोहारा जि. धाराशिव, इस्माईल महमदपाशा पटेल, वय 36 वर्षे, रा.लोहारा बु. ता. लोहारा जि. धाराशिव, रियाज महमद हुसेन कुरेशी, वय 38 वर्षे, रा. लोहारा बु. ता. लोहारा जि. धाराशिव, यांनी दि.05.05.2025 रोजी 09.10 ते 11.20 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे रिक्षा क्र एमएच 12 एच.सी 6262, ॲपे टमटम क्र एमएच 14 जी.सी.0056 व ॲपे टमटम क्र एमएच45 टी 3100 हा लोहारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक समोरील सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
मुरुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-स्वामीनाथ अंगद शिंदे, वय 38 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव,अरुण श्रीकांत पवार, वय 32 वर्षे, रा. कदेर ता उमरगा जि. धाराशिव, विरभद्र दयानंद स्वामी, वय 33 वर्षे, रा. करवंजी ता. लोहारा जि. धाराशिव, नागेश्वर लक्ष्मण खंडागळे, वय 40 वर्षे, रा. महालिंगरायवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.05.05.2025 रोजी 16.00 ते 17.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र एमएच 25ई 9775, क्रुझर क्र एमएच 13 ए.क्यु 0335, ॲपे रिक्षा क्र एमएच 25 बी.ए.7651 व रिक्षा क्र एमएच 16 ए.बी.5327 ही वाहने एनएच 65 रोडवर मिराईचौक येणेगुर व मुरुम मोड जाणारे एमएसईबी कार्यालयाचे समोर सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वंतत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.
धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-दिपक हरिचंद्र भिंगडे, वय 39 वर्षे, रा. देवळाली ता. जि. धाराशिव, यांनी दि.05.05.2025 रोजी 12.05 ते 12.15 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 1355, ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन1256 देशपांडे स्टॅण्ड समोर धाराशिव येथे व वेलकम मेन्सवेअर दुकानाजवळ रोडवर सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना धाराशिव शहर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये धाराशिव शहर पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने ज्वलनशील पदार्थ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे-शाम वामन वाघे, वय 25 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव,धनाजी दत्तु शिंदे, वय 33 वर्षे, वय 55 वर्षे, रा. महादेववाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.05.04.2025 रोजी 14.00 वा. सु. महादेववाडी पाटी येथील हॉटेल नादखुळा समोर सार्वजनिक रोडचे बाजूला बेकायदेशीरपणे विना परवाना रस्त्याचे बाजूला गॅस सिलेंडर टाकी जोडून पेटवून वडे करत असताना व स्वत:हास,मानवी जिवीतास धोका व मालमत्तेस धोका होवून जिवीत किंवा वित्त हानी होवू शकते याची जाणीव असताना ही निष्काळजीपना करुन भा.न्या.सं. कलम-287 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द बेंबळी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ अवैध गुटखा विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे:आरोपी- नितीन वैजीनाथ शिंदे, वय 23 वर्षे, रा.निपाणी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.04.05.2025 रोजी 21.00 वा. सु.ईट येथील जगदंबा पान स्टॉलचे पाठीमागे अंदाजे 6,375 ₹ किंमतीचा राज निवास पान मसाला 25 पॉकेट जाफरानी जर्दा नावाची तंबाखुची पुडी 25 पॉकेट हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सम पदार्थ विनापरवाना अवैद्यरित्या बाळगुन विक्री करत असताना मिळून आला. यावरुन पोलीसांनी अवैध गुटखा जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.न्या. सं. कलम 123,223,274,275 सह कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“मारहाण.”
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-परमेश्वर विठ्ठल गुंडरगे, अभि रुपचंद मंडले, अविनाश तुळशीराम फिरंगे सर्व रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.04.05.2025 रोजी 22.30 वा. सु. एम.एस.ई.बी पावर हाउस जवळ मुरुम मोड ते मुरुम जाणारे रोडवर फिर्यादी नामे- मिलींद शरणु कांबळे, वय 40 वर्षे रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी रिक्षा आडवून तुमच्या खाणदानामुळे आम्हाला वाईट दिवस आले आहेत, असे म्हणुन जिवे ठार मारण्याचे शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,कोयता, लोखंडी पात्याचे हत्यार व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मिलींद कांबळे यांनी दि.05.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 109, 126(2), 351(2),351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-सुरज उर्फ बापु श्रीकृष्ण उर्फ किसन जावळे, सागर पारेकर, अजय शंकर कदम सर्व रा. कसबा पेठ ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.05.05.2025 रोजी 16.00 वा. सु. ढोकी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील मयुर रुण्वाल यांचे नविन बिल्डींग समोर फिर्यादी नामे- मुजफर अल्ली सादीक अल्ली सय्यद, वय 50 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दारु पिवून येवून स्लॅबचे सिमेंटचे प्लेटवर उभा राहिला त्यावर फिर्यादी त्यास म्हणाला बाजूला उभा रहा प्लेटा नालीवर ठेवायच्या आहेत त्यावर नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पार, कड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मुजफर अली सय्यद यांनी दि.05.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 352, 351(2),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-गरीबनजवा रफीक शेख, फरीद रफीक शेख, हसिना रफीक शेख, हिना जमिल शेख सर्व रा. इदगाहच्या मागे, अमीन चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.16.04.2025 रोजी 14.30 वा. सु. इदगाहच्या मागे, अमीन चौक धाराशिव येथे फिर्यादी नामे- सहाराबी अजीम शेख, वय 62 वर्षे, रा. मुन्सी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दारु नोकरीवरुन रिटायर झाला आहात मला घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये द्या या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सहाराबी शेख यांनी दि.05.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 117(2),118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“नुकसान करणे.”
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-बाळासाहेब केशव तानवडे, प्रथमेश संतोष तानवडे, दत्तात्रय बाळासाहेब तानवडे, योगेश बाळासाहेब तानवडे सर्व रा. केमवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.05.05.2025 रोजी 10.00 वा. सु. फिर्यादी नामे- शिवशंकर महादेव तानवडे वय 42 वर्षे रा. केमवाउी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे केमवाडी शिवारातील शेत गट नं 142 पाण्याची पाईप लाईनवर दगड घालुन तोडून पाईपलाईनचे व चार मोटारीचे बोर्डाचे आग लावून जाळुन नुकसान केले. शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवशंकर तानवडे यांनी दि.05.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 326(एफ), 324 (4), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-अजित शिवाजी बोळे रा. पिंपळगाव धस ता. बार्शी जि. सोलापूर व सोबत मयत नामे-महेश तुकाराम पवार, वय 32 वर्षे, रा. टी.पी.एस. रोड ममता कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव हे दोघे दि.31.03.2025 रोजी 19.30 ते 19.45 वा. सु.मोटरसायकल वरुन जात होते. दरम्यान दरम्यान आरोपी नामे- अजित बोळे यानी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलसमोर डुक्कर आडवे आल्याने अचानक समोरील ब्रेक दाबल्याने पाठीमागे बसलेले महेश पवार हे मोटरसायकल वरुन खाली पडून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमेश तुकाराम पवार, वय 29 वर्षे, रा. ममता नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.05.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक