June 26, 2025

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

  • लातूर – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण,संस्था लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात जयंती उत्सव समिती,आय.क्यु.ए.सी आणि कार्यालयाच्यावतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.
    यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी प्राचार्य कक्षामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी महाविद्यालयाचे मुख्य समन्वयक डॉ.नल्ला भास्कररेड्डी,उपप्राचार्य प्रा.संजय पवार,पर्यवेक्षिका प्रा.वनिता पाटील,जयंती उत्सव समितीचे समन्वयक डॉ.डी.आर.भुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी प्राचार्य डॉ.संजय गवई यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये समाजासमताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी बहुमोल कार्य केले असे सांगून आजच्या जयंती दिनी आपण सर्वांनी मानवतावादी दृष्टिकोनातून आपले मानवी वर्तन केले पाहिजे असे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डी.आर.भुरे यांनी केले.
    यानंतर महाविद्यालयासमोरील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला प्राचार्य,मुख्य समन्वयक, उपप्राचार्य,पर्यवेक्षिका,कार्यालय प्रमुख,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.
    यावेळी कला शाखा समन्वयक डॉ.सदाशिव दंदे,समाजकार्य शाखा समन्वयक डॉ.दिनेश मौने, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. विजयकुमार सोनी,पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.यशवंत वळवी, संशोधन केंद्र समन्वयीका डॉ. शितल येरुळे,डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.आनंद शेवाळे,डॉ.शिवप्रसाद डोंगरे,डॉ.मनोहर चपळे, डॉ. सुजित हंडीबाग,डॉ.मंतोष स्वामी, डॉ.जे.एच.देशमुख,प्रा.रमेश तडवी,प्रा.रवींद्र सुरवसे,प्रा.रवींद्र सोनोने,प्रा.नारायण गोरे,डॉ.डॉ. टि.घन:श्याम,प्रा.शैलेश कानडे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!