कळंब – जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा या शाळेने नरसिंह जयंती निमित्त दि.२ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गुणगौरव पर कार्यक्रम कलादर्पण- २०२५ अतिशय देखण्या स्वरूपात सादर केला.कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच विजय शिंदे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद गालट, गावातील प्रतिष्ठित नागरिक तांबे दादा,बाळासाहेब लोमटे, तंटामुक्ती अध्यक्ष सारंग पोलिस पाटील विशाल टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रांतर्गत घटक शाळेचे मुख्याध्यापक चटलेवाड, बाळकृष्ण कुंभार,सुरेश निर्फळ,चंद्रशेखर पाटील हेही कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.शाळेतील बालकांनी सदर कार्यक्रमात विविध पौराणिक, ऐतिहासिक,सामाजिक प्रश्नावर विविध गीते व प्रसंग सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. छत्रपती शंभू महाराजांच्या फितुरीने केलेल्या हत्येचा हृदयद्रावक प्रसंग, रामायणामधील सीतेचे हरण, आणि महाभारतातील द्युत खेळत असताना द्रौपदीचा कौरवाकडून झालेला अपमानास्पद प्रसंग याबाबतच्या पौराणिक आणि ऐतिहासिक घटना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर साक्षात उभ्या राहिल्या.नव्या जुन्या चित्रपटातील अविट गोड गाणी,बाई पण भारी देवा तसेच देशभक्तीपर गीते आणि दक्षिणात्य गीते यामधून उपस्थित बालके,महिला,तरुण वर्ग व सर्वांचीच मने जिंकली.सुमारे साडेचार तास झालेल्या या कार्यक्रमास आजूबाजूच्या गावातील प्रेक्षकही उपस्थित राहिले.यावेळी शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित प्रेक्षकांसमोर गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला चिरंजीव श्लोक हनुमंत घाडगे या विद्यार्थ्यांची निवड सैनिकी स्कूल तुळजापूर येथे तर कुमारी मंजुषा लोमटे व ज्ञानेश्वरी कवडे या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्रता धारक झाल्यामुळे आणि कुमारी शरण्य ठाकूर हिंदवी माने स्वरांजली माने यांनी मंथन टॅलेंट सर्च या परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गावातील अबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक हनुमंत घाडगे यांनी केले.श्रीमती भारती सूर्यवंशी,श्रीमती मंजुषा कराड,मकरंद नाडे,गणेश तपिसे,शाळेच्या माजी शिक्षिका समीना बागवान,चंद्रशेखर पाटील,मयुर क्षिरसागर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस संतोष भोजने यांनी केले.
More Stories
श्री गुलाब महाराज दिंडीचे हरी नामाच्या गजरामध्ये स्वागत
कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न
विद्याभवन हायस्कूल कळंब येथे जागतिक ऑलिंपिक डे साजरा