June 26, 2025

धाराशिव जिल्हा पोलीस नामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.03 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 300 कारवाया करुन 2,33,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी –सचिन उर्फ शिवाजी प्रभाकर जाधव, वय 40 वर्षे, रा.उमरगा चिवरी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.03.05.2025 रोजी 18.00 वा. सु.उमरगा चिवरी येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे:आरोपी – सुरेखा कैलास पवार, वय 25 वर्षे, रा.शिवशक्ती नगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.03.05.2025 रोजी 08.30 वा. सु.आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,500 ₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • भुम पोलीस ठाणे:आरोपी –कृष्णाथ साहेबराव सोनवणे, वय 48 वर्षे, रा.उमाचीवाडी ता.भुम जि. धाराशिव हे दि.03.05.2025 रोजी 20.50 वा. सु.कृष्णाथ साहेबराव सोनवणे यांचे घरासमोरील रोडवर अंदाजे 1,120 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 7 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
    धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.03.05.2025 रोजी 20.50 ते 21.20 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-ललित नेताजी पवार, वय 28 वर्षे, रा. गोपज्ञळनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 21.20 वा.सु. राजधानी हॉटेलच्या लगत असलेल्या शेडच्या समोर मिलन नाईट इंडियन जुगाराचे साहित्यासह एकुण 740 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-सोनु पोपट काळे, वय 22 वर्षे, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव ता. जि. धाराशिव हे वा.सु. 20.50 वा. सु. नगर पालीका सार्वजनिक शौचालय इंदीरानगर समोर मिलन नाईट इंडीयन जुगाराचे साहित्यासह एकुण 970 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
    लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-सलीम बाशीमिया मुल्ला, वय 49 वर्षे, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव, बस्वराज विश्वनाथ तावसे, वय 43 वर्षे, जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव,राजकुमार अशोक उपासे, वय 35 वर्षे, रा. जेवळी द. ता. लोहारा जि. धाराशिव, संजय किसन विरुध्दे, वय 45 वर्षे, रा. लोहारा बु. ता. लोहारा जि. धाराशिव, विकास बळीराम कांबळे, वय 52 वर्षे, रा. रामपुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.03.05.2025 रोजी 11.00ते 15.00 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 1049, ॲपे रिक्षा क्र एमएच 23 एक्स 4328,ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 0724, महिंद्रा मॅक्स क्र एमएच 04 ए.वाय. 4534 व ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 0274 ही वाहने वेगवेगळ्या 5 ठिकाणी सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-बाजीराव केरबा मोरे, वय 37 वर्षे, रा. शेंडी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.02.04.2025 रोजी 19.30 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल तांदुळवाउी ते पिंपळगाव क रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-युवराज तात्या बोरगळ, वय 26 वर्षे, रा. घाटनांदुर ता. भुम जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.03.05.2025 रोजी 10.30 ते 14.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील पेटीमधील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 20,000₹ असा एकुण 70,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-युवराज बोरगळ यांनी दि.03.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (3), 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-रेखा सागर राठोड, वय 28 वर्षे, रा. नाईकनगर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे,आप्पीबाई राठोड,रुपचंद चव्हाण, गणपत राठोड, व हुसेन नदाफ यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.03.05.2025 रोजी 01.00 ते 05.00 वा. सु. तोडूनआत प्रवेश करुन घरातील कपाटातील 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा एकुण 1,63,630₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रेखा राठोड यांनी दि.03.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (4), 305 गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-विठ्ठल राजाराम कुंभार, वय 62 वर्षे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 ए.वाय. 9991 जिचा चेसी नं ME4KC402LNA130253, इंजिन नंबर- KC40EA1130379 ही दि.03.05.2025 रोजी 00.30 ते 06.00 वा. सु. विठ्ठल कुंभार यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विठ्ठल कुंभार यांनी दि.03.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-कृष्णा नागनाथ कुंभार, ज्ञानेश्वर नागनाथ कुंभार, गजाबाई नागनाथ कुंभार सर्व रा. सराटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.03.05.2025 रोजी 15.30 वा. सु. सराटी शिवारातील शेत गट नं 170 मध्ये फिर्यादी नामे- रविंद्र रामचंद्र कुंभार, वय 50 वर्षे, रा. सराटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना त्यांची भावजई संगीता यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रविंद्र कुंभार यांनी दि.03.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1),329(3), 115(2),352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “नुकसान करणे.”
  • शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे-जनक वैजीनाथ कुंभार, वय 69 वर्षे, रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.25.04.2025 रोजी 13.00 वा. सु. खामसवाडी शिवारातील शेत गट नं 269 मधील 99 आर मध्ये फिर्यादी नामे- सारंग प्रकाशराव जोशी, वय 42 वर्षे, रा. शास्त्रीनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे खामसवाडी शिवारातील शेत गट नं 269 मधील 99 आर मधील उसाचे पिकाला आग लावुन त्यामधील ड्रिपची लाईन, केबल व पाईपलाईन जाळून अंदाजे 3,50,000₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सारंग जोशी यांनी दि.03.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 326(एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • भुम पोलीस ठाणे: मयत नामे-अक्षय अजिनाथ माने, व सोबत जखमी नामे- राजाभाउ नरहरी खोसरे हे दोघे दि.01.05.2025 रोजी 13.00 ते 13.30 वा. सु. लुना क्र एमएच 25 ए.झेङ 3904 गाडीवर वंजारवाडी येथुन भुम येथे जात होते. दरम्यान पार्डी ते भुम जाणारे रोडवर श्रावणी हॉटेलसमोर ट्रेलर क्र एमएच 46 ए.एफ.8443 चा चालकाने चालकाने त्याचे ताब्यातील ट्रेलर हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून राजाभाउ खोसरे व अक्षय माने यांचे लुना गाडीला पाइीमागून धडक दिली. या अपघातात अक्षय माने हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर राजाभाउ खोसरे हे जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सरस्वती अजिनाथ माने, वय 45 वर्षे, रा. वंजारवाडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.03.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ब), 106(1) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे: मयत नामे-नितीन रमेश जगताप, वय 38 वर्षे, रा. कडकनाथवाडी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.01.02.2025 रोजी 20.30 वा.सु. सोलापूर ते धुळे हायवे रोडवर तेरखेडा येथील पेट्रोल पंपाचे जवळ भवानी हॉटेल समोरुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून नितीन जगताप यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात नितीन जगताप हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतिश रमेश जगताप, वय 40 वर्षे, रा. कडकनाथवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.03.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(ब) सह 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!