कन्हेरवाडी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी ता.कळंब या शाळेचे दोन विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र झाले असुन इ 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेतही या शाळेचे घवघवीत यश मिळविले आहे. सिद्धी सुंदर जगताप – 258,यशराज परमेश्वर वाघमोडे – 208,साक्षी लक्ष्मण जाधव – 198,शिवराज विवेकानंद मिटकरी -160,कृष्णा गोरख साळुंके -152,आरोही शिवाजी कवडे – 144,आदर्श प्रशांत शिंदे – 142,स्वराज गणेश कवडे – 142,धीरज नारायण गायकवाड – 140,कस्तुरी किशोर कवडे – 128. हे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले असुन सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. शाळेच्या वतिने सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक दीपक चाळक,वाघमोडे परमेश्वर, झोरी नारायण, श्रीम.कंगळे आशा व पहिली ते चौथी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षिका श्रीम.गाढवे मंगल या सर्वांचा शाळेचे मुख्याध्यापक भंडारे बी. एन.व शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
More Stories
कन्हेरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
शिवव्याख्याते सुजित नामदेव तांबे यांच्यातर्फे पुस्तके भेट