धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.23 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 151 कारवाया करुन 1,14,500 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे- महादेव श्रीपती कांबळे, वय 73 वर्षे, रा. खानापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.22.04.2025 रोजी 16.00 वा. सु.खानापुर येथे आपल्या राहत्या घराच्या आडोशाला अंदाजे 2,400 ₹ किंमतीची 30 लिटर अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-समाधान बबनराव मातने, वय 30 वर्षे, रा. चिंचपुर ढगे ता.भुम जि. धाराशिव हे दि.23.04.2025 रोजी 19.00 वा. सु. चिंचपुर रोडवर रस्त्याचे उजवे बाजूस हॉटेल प्रताप जवळ अंदाजे 8,285 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 44 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-संतोष शंकर थोरात, वय 40 वर्षे, रा.धानुरी ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.23.04.2025 रोजी 13.10 वा. सु.धानुरी येथे अंदाजे 1,900₹ किंमतीची 19 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-शाहुराज विश्वनाथ सोनवणे, वय 75 वर्षे, रा.नागुर ता. लोहारा जि.धाराशिव हे दि.23.04.2025 रोजी 17.10 वा. सु.आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,200₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.23.04.2025 रोजी 14.15 ते 17.20वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-विशाल बालाजी पवळे, वय 26 वर्षे,रा.दत्तनगर सांजा धाराशिव ता. जि. धाराशिव हे 14.15 वा.सु. घोडके यांच्या दुकानाचे गाळ्यात सह्याद्री चहाचे हॉटेलच्या मागे गणेशनगर येथे चक्री जुगाराचे साहित्यासह एकुण 950 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-मेहराज इकराम शेख, वय 38 वर्षे, रा. गाजीपुरा फकीरा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 17.20 वा.सु. वैराग रोड, वैराग नाक्याजवळ धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,520 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-आदीनाथ निवृत्ती गायकवाड, वय 55 वर्षे, रा. जवळगाबेट ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. समता नगर मुबारकपुर ता. निलंगा जि.लातुर हे दि. 23.04.2025 रोजी 00.15 वा. सु. चौरस्ता व बायपास उमरगा शिवार एनएच 65 रोडवर उभा वाहनाची वाट पाहत होते. दरम्यान अज्ञात तीन इसमांनी ॲटो रिक्षा मध्ये येवून फिर्यादीस जबरदस्तीने ॲटो मध्ये बसवून उमरगा बायपास रोडवर कोरेगावाडी कडे जाणारे रस्त्यावर नेवून लाथाबुक्यांनी, चाकु व लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी करुन फिर्यादी जवळील बॅगमधील रोख रक्कम 5,550₹, दोन मोबाईल फोन व कागदपत्रे जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आदीनाथ गायकवाड यांनी दि.23.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 309(4)(6),118(2),137 (2),115(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-अश्वीनी गोविंदराव सोमवारे, वय 32 वर्षे, रा. रा.श्रीगणेश टॉवर बी 1 गावदेवी नौपाडा, पाथ मैदान जवळ ठाणे(पश्चिम) ह.मु. रचना हाईटस तिसरा मजला सि-6 तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांच्या मुख्य दरवाजाचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.23.04.2025 रोजी 11.00 ते15.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील ड्रावरमध्ये ठेवलेले 13 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 25,000₹असा एकुण 4,47,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अश्वीनी सोमवारे यांनी दि.23.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3),305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-दिपा अजित परदेशी, वय 39 वर्षे, रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. खडी रोड, देवळाई बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर जि. छत्रपती संभाजीनगर या दि. 22.04.2025 रोजी 13.25 वा. सु. कळंब बसस्थानक येथे बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून दिपा परदेशी यांचे पर्स मधील 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण1,05,095₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिपा परदेशी यांनी दि.23.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-विक्की उर्फ फक्कड जावळे, स्वप्नील उर्फ कद्या जानराव, सुमित गवळी तिघे रा. भुम ता.भुम जि. धाराशिव यांनी दि.19.04.2025 रोजी 20.30 वा. सु. इंदीरा वॉईन शॉप समोर भुम येथे फिर्यादी नामे- संदीप वसंत गाढवे, वय 35 वर्षे, रा. जिजाउ चौक भुम ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड काठी व लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संदीप गाढवे यांनी दि.23.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(2),115(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-पोपट भागवत वाघमारे, केसरबाई भागवत वाघमारे, आशाबाई परमेश्वर वाघमारे, सविता पोपट वाघमारे, सर्व रा. बरमगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.16.04.2025 रोजी 19.00 वा. सु. बरमगाव येथे सिमेंट रस्त्यावर फिर्यादी नामे-बालाजी गोविंद वाघमारे, वय 43 वर्षे, रा. बरमगाव ता. जि. धाराशिव यांना त्यांचे घरासमोरील नालीचा वास येत असल्याने ते विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन रोडवर ढकलून दिल्याने गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी वाघमारे यांनी दि.23.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 117(2), 118(2),115(2),352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-बबन गायकवाड, विशाल बबन गायकवाड, अमोल गायकवाड, जयकुमार कदम, सर्व रा. तोरंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.20.04.2025 रोजी 17.00 वा. सु. होळी येथे फिर्यादी नामे-नानासाहेब भुजंगराव पाटील, वय 56 वर्षे, रा. होळी ता.लोहारा जि. धाराशिव यांना व त्यांची दिव्यांग पत्नी सुमन यांना नमुद आरोपींनी मुलीचे नावे शेती का करत नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विळा. लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी झाले.तसेच फिर्यादीचा मुलगा किसन हा भांडण सोडवण्यास आला असता नमुद आरोपींनी त्यासही शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नानासाहेब पाटील यांनी दि.23.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) सह कलम 92 अपंग व्यक्ती अधिनियम 2016 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-राहुल सुग्रीव कांबळे, सुजित भारत कांबळे, दत्ता सुग्रीव कांबळे, सुदाम पोपट कांबळे, सर्व रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.22.04.2025 रोजी 09.00 ते 09.40 वा. सु. बावी फाट्यावर फिर्यादी नामे-गोवर्धन गोरख कांबळे, वय 49 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,दगड,गज व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच सुन क्रांती व पत्नी पदमीनी यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गोवर्धन कांबळे यांनी दि.23.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“फसवणुक.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-कुसुम संदीपान खामकर, वय 79 वर्षे, रा.उपळा ता. जि. धाराशिव यांना दि.23.04.2025 रोजी 13.30 वा. सु. अनोळखी एका महिलेने कुसुम यांचे उपळा येथील राहते घरी येवून मी तुमची भाच्ची आहे असे सांगुन फिर्यादीच्या नवऱ्याला शासनाकडुन दिड लाख रुपये भेटतात त्यासाठी फिस म्हणून लाखाला पाच हजार रुपये असे एकुण सात हजार रुपये द्यावे लागतात. असे विश्वासत घेवून व बतावणी करुन कुसुम खामकर यांचे कडून सात हजार रुपये व त्यांची पतीचे आधार कार्ड नेवून फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कुसुम खामकर यांनी दि.23.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 319(2),318(4),316(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
सुरेश टेकाळे,सुनील पुजारी,डॉ.गिरीष कुलकर्णी यांचा विशेष सत्कार
धाराशिव जिल्हा पोलिसनामा