कळंब (महेश फाटक) – सोलापूर येथील प्रख्यात न्यूरोफिजीशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांना कळंब येथील सर्व डॉक्टर्स च्या वतीने भावपूर्ण श्रृदांजली अर्पण करण्यात आली. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन चे माझी राज्य अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे आणि डॉ.श्याम चौधरी यांनी वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन मनोगत व्यक्त केले. डॉ.वळसंगकर यांच्या अकाली निधनाने सोलापूरसह मराठवाडा व कर्नाटक राज्यातील पेशंटचे खूप नुकसान झाले. यावेळी दोन मिनिटे मौन पाळून श्रृदांजली अर्पण करण्यात आली.यावेळी अध्यक्ष डॉ.शितल कुंकुंलोळ,सचिव डॉ.सत्यप्रेम वारे,डॉ.कमलाकर गायकवाड,डॉ.अभिजित लोंढे, डॉ.वर्षा कस्तुरकर,डॉ.प्रियंका जाधवर,डॉ.गिरीश कुलकर्णी,डॉ. आडसूळ,डॉ.रमेश जाधवर,डॉ. विवेक शिंदे,डॉ.सुनील थळकरी, डॉ पाखरे,डॉ.राजेंद्र बावळे,डॉ. सुशिल ढेंगळे,संभाजी कोळी आदींची उपस्थिती होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले