लातूर – लातूर शहर महानगरपालिकाच्या वतीने आठ दिवसाला पाणी पुरवठा केला जातो.नागरिक तेच पाणी आठ दिवस जपून वापरत असताना गेल्या महिन्यापासून नागरिकांना आठ दिवसाला भेटणारे पाणी हे गढूळ भेटत आहे.ते पाणी पिऊन लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.गेल्या महिन्यात महानगरपालिका आयुक्त यांनी स्पष्टीकरण दिले होते की,हे पाणी गढूळ असले तरी पिण्याच्या लायक आहे मग हे पाणी आयुक्ता सोबत सर्वच पालिकेचे अधिकारी यांनी नागरिकांसमोर येऊन पिऊन दाखवावे आसे आवाहन भिम आर्मीच्या वतीने विनोद कोल्हे यांनी केले आहे. गेल्या आठवढ्यात लातूरचे स्थानिक आमदार यांनी पालिकेच्या उपयुक्ता सोबत बैठक घेऊन लोकांना शुद्ध पाणी भेटावे म्हणून सूचना केल्या. त्या आमदाराला आता गढूळ पाणी दिसून आले ते एक महिण्यापेक्षा जास्त दिवसापासून येत आहे एवढ्या दिवस त्यांना हे पाणी दिसलें नाही का? त्यांच्या नंतर राजकारण म्हणून केंद्रात आणी राज्यात सत्ता असणारे भाजप चे लातूर मधील नेते यांनी लातूर महानगरपालिका समोर गढूळ पाण्यासाठी आंदोलन करुन स्थानिक आमदार यांच्या फोटोचा आभिषेक गढूळ पाण्याने केला. या भाजप नेत्याना गढूळ पाणी आता दिसून आले का जे आमदार यांनी हा प्रश्न उचलला तेव्हा यांना गढूळ पाणी दिसून आले या दोन्हीही काँग्रेस आणी भाजप यांचे हे राजकारण आहे हे सर्वाना स्पष्ट दिसून येत आहे. यांना लोकांच्या आरोग्याचे काही देणेघेणे नाही यांना फक्त रजकारण करायचे आहे लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार आणी खासदर हे निष्क्रिय आहेत यांना लोकांच्या समसेचे काही घेणे देणे नाही,येणाऱ्या काळात जर लोकांना शुद्ध पाणी नाही भेटले तर भिम आर्मीच्या वतीने आमदार खासदार यांच्या घरासमोर तीव्र आसे आंदोलन करण्यात येईल आणी जर हे पाणी पिऊन एखाद्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा जिवास काही बरे वाईट झाल्यास महानगरपालिका आयुक्त आणी अधिकारी यांच्यावर मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे मत भिम आर्मी भारत एकता मिशन मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे