धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.21 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 275 कारवाया करुन 2,37,350 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-तेजेस दिलीप सगर, वय 37 वर्षे, रा. वाणेवाडी ता. कळंब जि. धाराशिव साखर कारखाना चोराखळी ता.कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे पांढऱ्या रंगाची टी. व्ही एस ज्युपीटर स्कुटी क्र एमएच 25 बी बी 2011 अंदाजे 25,000₹ किंमतीची ही दि.06.04.2025 रोजी 21.30 ते दि.07.04.2025 रोजी 07.00 वा. सु. साखर कारखाना चोराखळी ता.कळंब जि. धाराशिव येथील फिर्यादीचे किराणा दुकाना समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तेजेस सगर यांनी दि.21.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सुनंदा विष्णु पवार, वय 30 वर्षे, रा. मुरुड ता. जि. लातुर ह.मु.येडशी ता. जि. धाराशिव या दि.20.04.2025 रोजी 01.30 ते 02.00 वा. सु. बसस्थानक धाराशिव येथे गेवराई बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून सुनंदा यांचे पर्स मधील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन असा एकुण 28,000 ₹ किंमतीची माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनंदा पवार यांनी दि.21.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रकाश राजेशकुमार व्दवेदी, वय 24 वर्षे, रा. देवमई ता. बिंदक जि. फतेहपुर राज्य उत्तरप्रदेश ह.मु.शिवाजीनगर भुम ता.भुम जि. धाराशिव यांचा साबळेवाडी शिवारातील क्लिन्टेक सोलर प्लॅन्ट येथील केबल, फोर कनेक्टर 48 जोडी, डी. सी. केबल 1300 मिटर, एम.सी. कनेक्टर 152 जोडी असा एकुण 76,000₹ किंमतीचा माली दि.10.04.2025 रोजी 09.00 ते 10.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रकाश व्दवेदी यांनी दि.21.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-शांताराम नंदु लोंढे, रा. बिलाल नगर धाराशिव, रोहीत गायकवाड, रा. काका नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.20.04.2025 रोजी 21.45 वा. सु. छायादिप लॉन्सचे आवारात धाराशिव येथे फिर्यादी नामे- सागर संतोष आरण, वय 19 वर्षे, रा. बिलाल नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काचेच्या बिअरच्या बाटलीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शांताराम लोंढे यांनी दि.21.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-जिवन सुभाष राठोड, आकाश बाबुराव राठोड, विशाल तात्याराव राठोड रा. कास्ती बु. ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.21.04.2025 रोजी 14.15 वा. सु. कास्ती बुद्रुक चौकातील भंडारे यांचे दुकाना जवळ फिर्यादी नामे-नितीन माणिक लोभे, वय 36 वर्षे, रा. नागुर ता.लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोठ्याने बोलण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी साकळी व हातातील कढ्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची हिरो होंडा मोटरसायकल रोडवर आदळुन नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नितीन लोभे यांनी दि.21.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),324(4), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन