August 8, 2025

जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करा..!!

  • संविधानवाद्यांची विभागीय आयुक्तालयावर प्रचंड निदर्शने …..
  • संभाजीनगर – नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर कठोर गदा आणणारे,जनसुरक्षा विधेयक २०२५ तात्काळ रद्द करावे म्हणून परिवर्तनवादी संघटनानी विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड निदर्शने केल्याचे पत्रक कॉ.भगवान भोजने यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
    या विधेयकाचे जर कायद्यात रूपांतर झाले तर,राज्यातील सर्व नागरिकांचे सर्व लोकशाही अधिकार संपुष्टात येणार असल्याने,राज्यात महंमद तुगलागी अमल सुरू होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
    अभिव्यक्ती स्वातंत्र्य मग ते कोणत्याही प्रकारचे असो,व्यक्त होणे,लिखाण करणे,गाने गाणे, चित्र काढणे इ.प्रकारांचा त्यात समावेश होऊ शकतो.अशा प्रकारावर बंदी घालण्याचे अधिकार सरकार व प्रशासनाला मिळणार असल्याचे ही नमूद केले आहे.
    लोकावर अन्याय – अत्याचार करणारा निर्णय किंवा कायदा केल्यास, ज्यांचे जगण्यावर या निर्णयाचा परिणाम होणार,ते जनसमूह,अशा निर्णयाविरुद्ध पेटून उठणारच,त्याला विरोध करणारच,ते मिळालेले स्वातंत्र्य ही सरकारची मेहेरबानी नसून, संविधानाचे दिलेले हक्क आहेत. पण जर ते हक्कच सरकार असे जुलमी कायदे करून हिरावून घेणार असेल तर,राज्याची जनता ते कधीही खपवून घेणार नाही, म्हणून दि.२२ एप्रिल २०२५ रोजी राज्यभर,या जुलमी जनसुरक्षा विधेयकाचा विरोध होत असून,ते तात्काळ रद्द करावे अशी मागणी होते आहे.
    जनसुरक्षा या गोंडस नावाने, लोकशाही, शांतता व अहिंसक पद्धतीने चालणारे सर्व संघर्ष या सरकारला मोडून काढायचे आहेत, असेही पत्रकात नमूद केले आहे.मुळे लोकशाही, सनदशीर,शांततेच्या आणि अहिंसेवर विश्वास असणाऱ्या संघटनांना देखील काम करणे अवघड होणार आहे.
    भिन्न मत मांडणे हा लोकशाहीचा आत्मा असून, तोच सरकार या विधेयकाचे माध्यमातून संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पत्रकात केला आहे.
    जनसुरक्षा विधेयक २०२५ विरोधी कृतिसमितीचे आवाहनानुसार सदरील निदर्शने केली असून,संविधान बचाव देश बचाव अभियान,भारत जोडो अभियान.,जय किसान आंदोलन – स्वराज अभियान,भाकप, आयटक,माकप,सीटू,लाल निशाण पक्ष,शेकाप , एस.एफ.आय,ए.आय.एस.एफ, श्रमिक मुक्ती दल,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,औरंगाबाद सर्वोदय मंडळ,मराठवाडा लेबर युनियन हा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ,कागद काच पत्रा कामगार संघटना, मोलकरणी व घरेलू कामगार संघटना, इ.संघटनांचे सुमारे ६० कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभाग घेतला.
    निदर्शनात प्रामुख्याने,जय किसान आंदोलन – स्वराज अभियान चे साथी सुभाष लोमटे, माकप चे कॉ.भगवान भोजने, ऍड. सचिन गंडले, कॉ.साक्रूडकर ,भाकप चे ऍड. अभय टाकसाळ, का.भास्कर लहाने,लाल निशाण पक्षाचे कॉ. भीमराव बनसोड,भाकप माले चे कॉ. बुद्धिनाथ बराल,साथी अनिल थोरात, शेकाप चे प्रा. चंद्रकांत चव्हाण, मराठवाडा लेबर युनियन – महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे ऍड. सुभाष सावंगीकर,साथी देविदास किर्तीशाही,साथी प्रवीण सरकटे, साथी जगन भोजने, भारत जोडो अभियान चे साथी भाऊसाहेब पठाडे, प्रा. गीता कोल्हटकर, प्रा. करुणा गंगावणे, श्रमिक मुक्ती दलाचे सुभेदार मेजर सुखदेव बन, कागद काच पत्रा कामगार संघटनेच्या साथी आशाबाई डोके, मोलकरणी व घरेलू कामगार संघटनेच्या साथी कांताबाई जाधव,इ.चा सहभाग घेतला.
error: Content is protected !!