धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.17 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 199 कारवाया करुन 1,65,450 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
भुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-प्रेमा बाजीराव काळे,वय 65 वर्षे, रा. कल्याणनगर पारधी पिडी भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.17.04.2025 रोजी 09.30 वा. सु.भुम येथील आठवडी बाजारात मच्छी मार्केट शेजारी मोकळ्या जागेत अंदाजे 2,500 ₹ किंमतीची 25 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-जनाबाई भागवत पवार,वय 55 वर्षे, रा. कल्याणनगर पारधी पिढी भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.17.04.2025 रोजी 10.45 वा. सु.बसस्थानकाचे पाठीमागे मोकळ्या जागेत अंदाजे 2,300 ₹ किंमतीची 25 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-बालाजी अंगद कांबळे,वय 47 वर्षे, रा. उत्तमी कायापुर ता. जि. धाराशिव हे दि.17.04.2025 रोजी 21.20 वा. सु.आपल्या शेतातील राहते घराचे शेडच्या बाजूला अंदाजे 840 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.17.04.2025 रोजी 12.00 ते 13.00 वा. सु. भुम पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले.यावेळी आरोपी नामे-सुरज नितीन वाळके, वय 28 वर्षे, रा. सुकटा ता. भुम जि. धाराशिव हे 13.00 वा.सु. भुम बसस्थानक गेटच्या बाजूस पान टपरीमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. तरआरोपी नामे-अनिल महादेव सुरवसे, वय 42 वर्षे, रा. लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव हे 12.00 वा.सु. भुम बसस्थानक गेटच्या बाजूस पान टपरीमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 530 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-मुस्ता करीम कुरेशी, वय 31 वर्षे, रा.ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.16.04.2025 रोजी 11.10 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 बीसी 6196 ही वाघोली येथील महात्मा गांधीचौकात सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना धाराशिव ग्रामीण पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये धाराशिव ग्रामीण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-इक्बाल जाफर कुरेशी, वय 35 वर्षे, रा. दत्तनगर ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.17.04.2025 रोजी 19.00 वा.सु.ढोकी येथील एमएस ई बी कार्यालयाच्या बाजूला रोडवर पिकअप क्र एमएच 13 सीजे 0114 मध्ये गोवंशीय जातीचे 4 जर्शी गायी एकुण 1,01,000 ₹ किंमतीचे गायी त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करताना ढोकी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5(अ),5(ब) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह कलम 119 मपोका सह प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1), (अ) (एफ)(एच) (डी) (आय) सह कलम 47,48,53,53 सह कलम 158/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-वैशाली अर्जुन नागरगोजे, वय 55 वर्षे, रा. घोळेवाडी ता. बार्शी जि. सोलापूर या दि. 17.04.2025 रोजी 13.30 वा. सु. येरमाळा आमराई येथील येडेश्वरी देवीच्या पालखी मंदीरात दर्शनासाठी आल्या असता अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून वैशाली नागरगोजे यांचे गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 70,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वैशाली नागरगोजे यांनी दि.17.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तसेच फिर्यादी नामे-प्रिया रोहीत भोगे, वय 40 वर्षे, रा.दहीसर मुंबई या दि. 14.04.2025 रोजी 15.30 वा. सु. आमराई येथील पालखी मंदीराच्या बाजूला परडी घेवून बसलेल्या महिलाकडील परडीत पिठ घालत असतानाअज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून प्रिया भेागे यांच बॅगमधील रोख रक्कम 5,000₹ व मोबाईल फोन असा एकुण 15,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रिया भोगे यांनी दि.17.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-उत्तमराव देवराव गुळवे, वय 51 वर्षे, रा. मासरुळ ता. जि. बुलढाणा ह.मु. पार्डी रोड भुम ता. भुम जि.धाराशिव यांचे ईट येथील महादेव मंदीराचे पाठीमागे बसवलेले ग्रामपंचायत कार्यालयाचे पाण्याचे आरओ प्लॉटचे कुलूप तोडून प्लांटची तोडफोड करुन प्लॉटमधील एकुण 15,000₹ किंमतीचा रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-उत्तमराव गुळवे यांनी दि.17.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2),324 (3) (4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रत्नदिप शिवाजी पटाडे, वय 37 वर्षे, रा. विश्वासनगर हडको तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. अयोध्या नगर हडको तुळजापूर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची टी व्ही एस व्हीक्टर काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 जे 3283 ही दि. 31.03.2025 रोजी 14.30 ते 23.56 वा. सु. पुष्पविकार मोबाईल शज्ञॅपी समार फुटपाथवर तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रत्नदिप पटाडे यांनी दि.17.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
अंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे-उमाजी हंबीरराव भांदुर्गे, शिवाजी हंबीरराव भंदुर्गे, नेताजी हंबीरराव भांदुर्गे, तिघे रा. भोंजा ता. परंडा जि. धाराशिव, शंकुतला वंसत गांगर्डे, रा. शेळगाव ता. परंडा जि. धाराशिव व इतर पाच इसम यांनी दि.17.04.2025 रोजी 09.00 वा. सु. काटेवाडी येथे फिर्यादी नामे- विनोद दत्तात्रय जाधव, वय 39 वर्षे, रा. काटेवाडी ता.परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून आत्या व मामा यांना संभाळण्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड, लोखंडी रॉड, लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले.तसेच फिर्यादीचे पत्नी आरती, भावजय आल्का व आई विजयमाला या भांडण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विनोद जाधव यांनी दि.17.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 118(1),118(2), 115(2),351(2), 352, 189(2), 191(2),191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-प्रणव विठ्ठल मेदणे, रा. भिकार सारोळा ता. जि. धाराशिव यांनी दि.15.04.2025 रोजी 19.30 वा. सु. भिकारसारोळा येथील शिवाजी चौक येथे फिर्यादी नामे- नारायण अंगद मुळे, वय 25 वर्षे, रा. भिकारसारोळा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने इंन्स्टाग्राम वरील स्टोरीला हसण्याचा सिम्बॉल /ईमोजी का टाकला या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नारायण मुळे यांनी दि.17.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 117, 118(1),115अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे: आरोपी मयत नामे-महेबुबखन समदानीखान खानसाब, वय 37 वर्षे, रा.येनकुरा ता. भालकी जि. बिदर ह.मु. न्यु हाफीज पैट प्रेमनर मियापुन हैद्राबाद व सोबत क्निर रत्नदिप प्रकाश सुर्यवंशी हे दोघे दि.16.04.2025 रोजी 14.00 वा. सु. पिकअप क्र टी.एस. 07 यु.एल.4715 मधून जात होते. दरम्यान आरोपी मयत नामे महेबुबखन समदानीखान खानसाब वरुन यानी त्याचे ताब्यातील पिकअप हे हायगयी व निष्काळजीपणे चालवल्याने अपघात होवून महेबुब खान समदानीखान खानसाब हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर क्निर रत्नदिप सुर्यवंशी हे किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रत्नदिप प्रकाश सुर्यवंशी, वय 21 वर्षे, रा.अनसारवाडा ता. निलंगा जि. लातुर यांनी दि.17.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ऑनलाईन फसवणुक.”
सायबर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बाबासाहेब कचरु वाडेकर, वय 51 वर्षे, रा. ह.मु. रुम नं 08 आफीसर क्वाटर्स धाराशिव साखर कारखाना चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव यांना दि.15.04.2025 रोजी 06.57 वा. सु. ते दि. 17.04.2025 रोजी 01.22 वा. सु. त्यांचा मोबाईल फोनवर मोबाईल क्र 725958038 चृया वापरकर्त्याने आमच्या कारखान्याचे चेअरमन/सी.एम.डी. अमर पाटील यांचा फोटो डी.पी. ठेवून त्यांची स्वत:ची ओळख लपवून अमर पाटील असल्याचे भासवुन फिर्यादीस बॅक खाते क्र 20100043466464 वर 1कोटी 10 लाख ₹ ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगुन ऑनलाईन आर्थीक फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाबासाहेब वाडेकर यांनी दि.17.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), सह कलम 66 (सी), 66(डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“लैंगीक अत्याचार.”
शिराढोण पोलीस ठाणे :एका गावातील एक 18 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.13.02.2025 रोजी 20.00ते 21.00 वा. सु. व दि. 14.02.2025 रोजी 06.00 वा. सु. ही नैसर्गिक विधी साठी जात असताना ती एकटी जात असल्याचा फायदा घेवून गावातील दोन तरुणांनी तिस आडवून त्यातील एका तरुणाने तो जसे म्हणतो तसे करु दे नाहीतर तुला जीवच मारुन टाकीन अशी धमकी देवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.17.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1), 64(2), (M) 126 (2), 351(2), 3(5) सह कलम4,6 बा.लै.अ.सं. कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन