धाराशिव – शहरातील प्रख्यात व अ वर्ग दर्जा असणारे जिल्ह्यातील एकमेव असे नगर वाचनालयची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. धाराशिव येथील या नगर वाचनालयास स्थापन होऊन १०० वर्षपिक्षा अधिक काळ झाला आहे.हे वाचनालय सक्षमपणे वाचक तसेच अभ्यासकांच्या वाचनीय गरजा पूर्ण करीत आहे. नगर वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ संपल्याने कार्यकारी मंडळाने वाचनालयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.या कार्यक्रमानुसार संस्थेच्या अजीव सभासदाची यादी प्रसिद्ध करणे, यादीस हरकती व सूचना स्वीकारणे,अंतिम यादी प्रसिद्ध करणे,उमेदवारी अर्ज स्वीकारणे, उमेदवारी अजार्ची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे,उमेदवारी अर्ज परत घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे या सर्व प्रक्रिया करून दि.१९ एप्रिल २०२५ रोजी कार्यकारी मंडळाच्या ११ जागांसाठी ११ उमेदवारांचेच अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली.यामध्ये कार्यकारी मंडळाच्या संचालकपदी नितीन तावडे,श्रीकांत साखरे,अंबादास दानवे,प्रा.सतीश कदम,शरद मुंडे, प्रदीप साळुंखे,प्रज्ञा शेळके, आशिष मोदानी,बालाजी तांबे, रमेश सूर्यवंशी व सुभाष पाटुळे पाटील यांचा समावेश आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन