May 9, 2026

भारतीय जनतेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमूळे सार्वभौमत्व प्राप्त झाले – अध्यक्ष आदिनाथ सांगवे

  • लातूर – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमूळे भारतीय जनतेला सार्वभौमत्व प्राप्त होऊन सन्मानाने जगण्याचे सामर्थ्य मिळाले असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांनी केले.
    महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात विश्वमानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती प्रसंगी ते बोलत होते.
    यावेळी शिक्षण संस्थेचे संचालक बस्वराज येरटे,मुख्य समन्वयक डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, पर्यवेक्षिका प्रा.वनिता पाटील, IQAC समन्वयक डॉ.आनंद शेवाळे,डॉ.दिनेश मौने,डॉ. यशवंत वळवी डॉ.सिद्राम डोंगरगे,डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ. विजयकुमार सोनी,डॉ. शिवप्रसाद डोंगरे,डॉ.गुणवंत बिरादार,डॉ.शीतल येरुळे, प्रा. रवी सोनोने, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. रवींद्र सुरवसे, डॉ. घनश्याम विठ्ठल आणि कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थितीहोती.
    पुढे बोलताना आदिनाथ सांगवे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक होते, शिक्षणाचे महत्त्व जनसामान्यांना सांगून ज्ञानाची श्रीमंती त्यांनी जगाला दाखवून दिली. दीन दलित,उपेक्षित,दुबळे,वंचितांना ताठ मानेने जगण्याचे सामर्थ्य त्यांच्यामुळे प्रदान झाले. डॉ. बाबासाहेब हे अनंत पैलूंचे सामाजिक योद्धे होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, महामानव, जलतज्ज्ञ, कृषी तज्ज्ञ, कामगारांचे नेते, स्त्री उद्धारक, दृष्टे राजकर्ते, समाज सुधारक, युग निर्माता, युगप्रवर्तक, प्रज्ञावंत विद्यार्थी या त्यांच्या उपाध्या त्यांचे श्रेष्ठत्व सांगतात. महापुरुषांचे विचार, त्यांचे जीवन चरित्र हे सदैव प्रेरणादायी असत. उदयोन्मुख पिढ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समताधिष्ठित समाज निर्माण करणाऱ्या महामानवांचा इतिहास जाणीवपूर्वक सांगितला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. आनंद शेवाळे यांनी मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यशपाल ढोरमारे, विनायक लोमटे, राम पाटील, श्रीशैल्य पाटील, शुभम बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!