धाराशिव – विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर येथील ग्रंथालयातील वाचन कक्षात,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सलग १४ तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रतिमा पुजनाने उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय समाजाला समता, स्वातंत्र्य,बंधुत्व व न्यायाचे अधिष्ठान देणारे महान समाजसुधारक,अर्थतज्ञ,नेते, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी उत्साहात साजरी करण्यात येते. भारतीय संविधान निर्मितीत त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.सर्व नागरिकांना समान हक्क सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण तरतुदी जोडल्या.त्यांनी समाजातील शोषित वर्गासाठी शिक्षण, समानता आणि न्यायासाठी लढा दिला.जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि कार्य आत्मसात करणे आवश्यक आहे.समाजात समता आणि बंधुत्वाची भावना वाढविण्याची प्रतिज्ञा घेण्यात येते.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ.मेघश्याम पाटील, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक तुकाराम हराळकर,विविध विभागातील प्राध्यापक, संशोधक,आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक