आष्टा (संघपाल सोनकांबळे) – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कुल,आष्टा ताभूम येथे भारताचे संविधान निर्माता, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रमुख उपस्थितींमध्ये सहशिक्षक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे, संघपाल सोनकांबळे, सहशिक्षिका निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव व बबन यादव यांचा समावेश होता.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली.यावेळी मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी सामाजिक समता,शिक्षणाचा प्रसार व राष्ट्रनिर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून,डॉ. आंबेडकरांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत,असे मत प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केले.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
प्रा.रोहित मोहेकर यांच्या संकल्पनेतून विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप