August 8, 2025

वेद शैक्षणिक संकुलात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

  • कळंब (राजेंद्र बारगुले) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने आणि भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुलात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती दि.१४ एप्रिल २०२५ रोजी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
  • या कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,समाजसुधारक आणि विद्वत्तेचा प्रकांड पांडित्य असलेले परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला.त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याला,शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला,वंचितांना न्याय देण्यासाठी घेतलेल्या संघर्षांना आणि संविधान निर्मितीतील अमूल्य भूमिकेला उजाळा देण्यात आला.
    याप्रसंगी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक अर्जुन मंडाळे,आदित्य गायकवाड, विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!