September 24, 2026

वेद शैक्षणिक संकुलात सा.साक्षी पावनज्योत विशेषांकाचे प्रकाशन

  • कळंब – वेद शैक्षणिक संकुलातील सभागृहात भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते सा.साक्षी पावनज्योतच्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
    विशेषांकाचे प्रकाशन
    उत्साहात पार पडले.
    या प्रसंगी बोलताना प्राचार्य सतिश मातने म्हणाले, “बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या महामानवांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य या विशेषांकाद्वारे होत आहे.साक्षी पावनज्योत हे केवळ वृत्तपत्र नसून,हे पुरोगामी विचारांचे एक प्रभावी विचारमंच आहे.”
    या विशेषांकात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास, त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील संदर्भासहित विश्लेषण,तसेच नव्या पिढीला प्रेरणा देणारे विविध लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,कार्यकारी संपादक प्रा. अविनाश घोडके,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक अर्जुन मंडाळे,आदित्य गायकवाड, विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!