परंडा – क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती परांडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंचित बहुजन आघाडी व फुले आंबेडकर विव्दत सभेच्या वतीने साजरी करण्यात आली.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणन परंडा पोलिस ठाणे येथील पोलीस निरीक्षक डी.बी.पारेकर,फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे,वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के,जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे,शहराध्यक्ष किरण बनसोडे,जनार्धन मेहेर गोरख मोरजकर,उतरेश्वर ठवरे, जेष्ठ साहित्यीक तु.दा.गंगावणे,प्रा.विलास गायकवाड,शिवाजी येवारे,श्रिहरी नाईकवाडी,मारुती अलबते,मुर्तुजा सय्यद,बाळासाहेब माकणीकर,दत्ता मेहर,मधुकर सुरवसे,मोहम्मद शेख, कानिफनाथ सरपने,राहुल पवार रणधिर मिसाळ,उमेश माळी,इरशाद बागवान,सुरेश डाकवाले,अतुल नरुटे उपस्थित होते.क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते धूप दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी सामाजिक संघटना मध्ये शैक्षणिक सामाजीक व राजकीय कार्य करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक पारेकर यांनी उपस्थित सर्वांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.तसेच फुले आंबेडकर विव्दत सभेचे राज्य समन्वयक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांनी केले तर परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे यांनी आभार मानले.
More Stories
तंबाखूचा वापर हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण – डॉ.शहाजी चंदनशिवे
भीम प्रतिष्ठानच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी
रा.गे.शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा