येरमाळा – ज्याअर्थी उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग कळंब यांनी पत्र जा.क्र. उपविपोअ / वाहतुक मार्गात बदल / 1311 / 2025 दिनांक 15/03/2025 अन्वये सादर केलेल्या अहवालात सादर केले आहे की,श्री.येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रा दिनांक 09/04/2025 ते दिनांक 18/04/2025 पावेतो साजरी होणार आहे. सदर चैत्री पौर्णिमा कालावधीत मौजे येरमाळा ता. कळंब मध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.तसेच दिनांक 12/04/2025 व दिनांक 13/04/2025 या कालवधीत,पालखी मिरवणुक, चुनखडी वेचणे व पौर्णिमा निमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यातुन लोखोंच्या संख्येने भाविक वाहनांने येत असतात. अशा वेळी वाहतुकीची कोंडी होवु नये,भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता येरमाळा ता. कळंब कडे येणारे मार्गावरील अवजड वाहने अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे आमचे निदर्शनास आणून दिले आहे. त्याअर्थी आम्ही किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) जिल्हादंडाधिकारी, धाराशिव व संजय जाधव (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, धाराशिव आम्हास प्राप्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) अन्वये अधिकाराचा वापर करुन भाविकांचे सुरक्षीततेच्या कारणावरुन खालील प्रमाणे वाहतुक मार्गात बदल करणे बाबत निर्देशित करीत आहोत. दिनांक 11/04/2025 रोजीचे 00:01 ते दिनांक 13/04/2025 रोजीचे 24:00 वाजे दरम्यान खालील मार्गावरून पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनास ( Heavy Vehicles ) मनाई करण्यात येत आहे.
1)छत्रपती संभाजीनगर ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा →कुसळंब → बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
2) बार्शी ते येरमाळा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी →कुसळंब → येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
3) कळंब ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा→ कुसळंब→ बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
4) बार्शी ते येरमाळा मार्गे कळंब कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी →कुसळंब →येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
5) बार्शी ते येरमाळा मार्गे परळी, परभणी कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी→कुसळंब→ येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
6) परभणी, परळी ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा →कुसळंब → बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
7) कळंब ते येरमाळा, मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा → छत्रपती संभाजीनगर या दरम्यान मानई करण्यात येत आहे.
8) छत्रपती संभाजीनगर ते येरमाळा, कळंब कडे येणारी वाहतुकीस येरमाळा → कळंब या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
܀ सदरील मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील.
1) छत्रपती संभाजीनगर ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुक येरमाळा उड्डाण पुलावरुन →येडशी मार्गे → बार्शी कडे पथक्रमण करतील.
2) बार्शी ते येरमाळा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहतुक बार्शी →कुसळंब→ पांगरी →येडशी →येरमाळा उड्डाण पुलावरुन मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे पथक्रमण करतील.
3) कळंब ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुक कळंब →मोहा फाटा (मनुष्यबळ पाटी) →दहीफळ→ येडशी →पांगरी कुसळंब मार्गे →बार्शी कडे पथक्रमण करतील.
4) बार्शी ते येरमाळा मार्गे कळंब कडे येणारी वाहतुक बार्शी→ कुसळंब →पांगरी→ येडशी→ दहीफळ→ मोहा फाटा (मनुष्यबळ पाटी) मार्गे→ कळंब कडे पथक्रमण करतील.
5) बार्शी ते येरमाळा मार्गे परळी, परभणी कडे येणारी वाहतुक बार्शी →कुसळंब→ पांगरी →येडशी→ ढोकी → कळंब मार्गे→ परळी →परभणी कडे पथक्रमण करतील.
6) परभणी, परळी ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुक परभणी→ परळी→ कळंब →ढोकी →येडशी → पांगरी → कुसळंब मार्गे →बार्शी कडे पथक्रमण करतील.
7) कळंब ते येरमाळा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतुक ही कळंब→ मनुष्यबळपाटी →मांडवा → वाशीफाटा मार्गे→ छत्रपती संभाजीनगर कडे पथक्रमण करतील.
8) छत्रपती संभाजीनगर, येरमाळा मार्गे कळंब कडे येणारी वाहतुक ही वाशीफाटा→ मांडवा→ मनुष्यबळपाटी मार्गे → कळंब कडे पथक्रमण करतील.
वरील बंधने ही पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाच्या वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना, हलकी वाहने (Light Vehicles) व एस. टी. बसेसला लागू राहणार नाही.
More Stories
ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
येरमाळा येथे श्री दत्तगुरू देवाची प्रतिष्ठापना
ज्ञानोद्योग माध्यमिक विद्यालयातील जुन्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा