धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 10 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 177 कारवाया करुन 68,000 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.10.11.2023 रोजी 17.15 वा. सु. मुरुम पो. ठा. दाळींब येथील ज्योती फर्टीलायझर दुकानाचे पाठीमागे असलेल्या पत्राचे शेडचे समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)अमर गुलाब पोटकर, वय 32 वर्षे, 2) सुरेश शंकरराव विभुते, वय 58 वर्षे, 3) इरफान आबास अली शारवाले, वय 31 वर्षे, 4) चंद्रकांत शरणप्पा भुजबळ, वय 33 वर्षे, 5) नुर जिलानी बागवान, वय 37 वर्षे, 6) इमरान नजीर वरनाळे, वय 32 वर्षे, 7) उमेश राव्हलदुरे, वय 36 सर्व रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव, हे सर्वजन तिरट जुगाराचे साहित्यासह एकुण 1,860 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.10.11.2023 रोजी 19.45 वा. सु. कळंब पो. ठा. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनार लाईन जाणारे रस्त्याचे बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)समशेर गफर पठाण, वय 31 वर्षे, 2) फिरोज फारुख शेख, वय 34 वर्षे रा. इंदीरा नगर कळंब जि. धाराशिव, हे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनार लाईन जाणारे रस्त्याचे बाजूस ऑनलाईन चक्री जुगाराचे साहित्यासह एकुण 3,320 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.10.11.2023 रोजी 17.55 वा. सु. वाशी पो. ठा. ईट येथील हाडुळे पेट्रोलपंपा जवळ लिमकर यांचे कॉम्पलेक्सच्या पाठीमागील मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)आश्रु नागु थोरात, वय 60 वर्षे, 2) नवनाथ एकनाथ थोरात, वय 37 वर्षे, 3)दादासाहेब विक्रम थोरात, वय 32 वर्षे, 4) विक्रम खंडू शिंदे, वय 35 वर्षे, 5) समाधान शहाजी हुंबे, वय 35 वर्षे, 6) युवराज जालींदर हुंबे, वय 36 वर्षे, 7) रमेश विठ्ठल हुंबे, 8) रोहन माणिक थोरात, वय 34 वर्षे, सर्व रा. ईट ता. भुम जि. धाराशिव, हे सर्वजन ईट येथील हाडुळे पेट्रोलपंपा जवळ लिमकर यांचे कॉम्पलेक्सच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तिरट जुगाराचे साहित्यासह एकुण 3,430 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
येरमाळा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) आकाश बाळासाहेब लंकेश्वर, रा. दत्तनगर बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर हे दि.10.11.2023 रोजी 18.33 वा. सु. आपल्या ताब्यातील किया कार क्र एमएच 13 ईसी 1457 ही येरमाळा चौक ब्रिज खालुन रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- रघुनाथ काशिनाथ जाधव, वय 68 वर्षे, रा. भोसरी, पुणे ह.मु. दापका, ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची पांढरा पट्टा असलेली मोटरसायकल क्र एमएच 14 केके 0557 ही. दि. 08.11.2023 रोजी 20.00 ते दि. 10.11.2023 रोजी 00.30 वा. सु. रघुनाथ जाधव यांचे राहाते घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रघुनाथ जाधव यांनी दि.10.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
आंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)महादेव पाचरणे, 2) पार्वती पाचरणे, 3) किसन पाचरणे, 4) रामचंद्र पाचरणे, 5) तुकाराम पाचरणे, सर्व रा.तित्रंज ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.08.11.2023 रोजी 10.00 वा. सु. तित्रंज शिवारातील शेतात फिर्यादी नामे- दिनकर उध्दव लांडे, वय 43 वर्षे, रा. तित्रंज, ता. भुम जि. धाराशिव यांना त्यांचे शेतात बोर घेण्याचे कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन रस्त्यात आडवून लाथाबुक्यांनी, कुह्राडीचा दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- दिनकर लांडे यांनी दि.10.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 341, 143, 147, 148, 149, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे : मयत नामे- सिध्दाराम दयाप्पा बिराजदार, वय 35 वर्षे रा. कसगी, ता. उमरगा, जि. धाराशिव हे दि 09.11.2023 रोजी 21.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 ए 5198 यावरुन भुसणी पाटीजवळ प्लास्टीकचे कारखान्यासमोर रोडवरुन जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून सिध्दाराम बिराजदार यांचे मोटरसायकल धडक दिली. या आपघातात सिध्दाराम बिराजदार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी सिद्राम हाणुमंत चनगे, वय 50 वर्षे रा. कसगी ता उमरगा जि. धाराशिव यांनी दि.10.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 134 अ ब, 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“घरफोडी व दरोडा घालणारऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड.”
फिर्यादी नामे- सुभाष शंकर क्षिरसागर, वय 65 वर्षे, रा. लहुजी चौक समोर येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांचे व तानाजी क्षिरसागर, आनंद खंडागळे यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 04.10.2023 रोजी 16.00 ते दि. 09.10.2023 रोजी 11.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन 52 इंची सोनी कंपनीची एलईडी टिव्ही, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, पितळी दोन घागरी, दोन हांडे, तीन तांबे, तानाजी क्षिरसागर यांचे रुममधील रोख रक्कम 17,000₹ व आनंद खंडागळे यांचे रुममधील रोख रक्कम 13,000₹असा एकुण 83,900₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला होता. अशा मजकुराच्या सुभाष क्षिरसागर यांनी दि.10.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे गुरनं 300/2023 भा.दं.वि.सं. कलम- 454, 457, 380अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदर गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येरमाळा पोलीस ठाणे गुरन्र. 300/2023 भादवि कलम 457, 454, 380 अन्वये दाख असुन सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्स प्रिंट वरुन सदरचा गुन्हा हा आरोपी नामे- धिरज उर्फ अजय कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांने केला असल्याचे निष्पन्न झाले असुन नमुद गुन्ह्यातील आरोपी व गेला माल शोध घेणे कामी दि. 10.11.2023 स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना कुर्डवाडी चौक परंडा येथे असताना गुप्त बातमीदारामार्फत माहित मिळाली की, पोलीस ठाणे येरमाळा येथील गुन्ह्यातील इसम नामे – धिरज उर्फ अजय कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी ता. परंडा जि. धाराशिव हा शिक्षक कॉलनीच्या पाठीमागे, ता. परंडा येथे एका पत्राचे शेड मध्ये राहत आहे.अशी बातमी मिळाल्याने पथकाने लागलीच नमुद ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्यास त्याचे नाव गाव त्यांने त्याचे नाव- धिरज उर्फ अजय कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी ता. परंडा जि. धाराशिव असे सांगितले. त्यावर सदर आरोपीस नमुद गुन्ह्याविषयी सखोल चौकशी केली असता त्यांनी नमुद गुन्हा मी व माझे दोन साथीदार यांनी केल्याची कबुली दिली. सदर आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेले एलईडी टी व्ही, 3.5 ग्रॅम सोन्याचे दागिने,चांदीचे पॅजन,पितळी भांडी, रोख् रक्कम 30,000 ₹ यापैकी नमुद आरोपी कडून रोख रक्कम 5,000 ₹ व बजाज प्लसर 70,000₹ किंमतीची असा एकुण 75,000 ₹ चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी येरमाळा पोलीस ठाणे येथे हजर केला आहे. तरी सदर आरोपी विरुध्द पोलीस ठाणे बार्शी शहर गुरनं 05/2022 कलम 395, पोलीस ठाणे बार्शी शहर 594/2021 कलम 395, पोलीस ठाणे बार्शी शहर 566/2021 कलम 395, पोलीस ठाणे माढा जि. सोलापूर गुरनं 382/2021 397, 34, पोलीस ठाणे नेवासा जि. अहमदनगर गुरनं 1042/2023 कलम 395 मध्ये पाहीजे आरोपी आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांचे आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार, विनोद जानराव, फराहान पठाण, समाधान वाघमारे, पोलीस नाईक- जाधवर, चालक पोलीस अमंलदार/ गुरव यांचे पथकाने केली आहे. (सोबत छायाचित्र जोडले आहे.)
“अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.”
दि.09.11.2023 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरगा यांचे पथकास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन एक स्कॉर्पिओ गाडी ही चिंचकोट ते उजळम रस्ता उमरगा येथुन जात आहे. त्यावर पथकाने लागलीच तेथे जावून जाणारे येणारे वाहने चेक करत असताना समोरुन येणारे वाहन क्र एम.एच. 14 डी एफ 3040 स्कॉर्पिओ हे वाहन पेट्रोलिंग दरम्यान चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. यातील चालक आरोपी नामे-1) आजिम आयुब उमाटे, वय 34 वर्षे, रा. कपिलनगर खाडगाव रोड, लातुर ता.जि. लातुर, 2)सज्जाद ईस्माईल सय्यद, वय 36 वर्षे, रा. औसा मोड, हाश्मीनगर औसा ता. औसा जि. लातुर यांचे ताब्यात सदर वाहनात 1) रजनीगंधा सुगंधीत मसाला 100 ग्रॅम 180 टिन असलेले 14 बॉक्स, 2) ) रजनीगंधा सुगंधीत मसाला 1 कि ग्रॅ, 3)बाबा नवरत्न मसाला 100 ग्रॅम 10 टिन, 4) बाबा नवरत्न पान मसाला 1 कि. ग्रॅ, 5) आर एम डी पान मसाला 20 बॉक्स, 6) एम सेनटेंड टोबॅको 20 बॉक्स, 7) बाबा 120 प्रिमियम चुविंग टोबॅको200 ग्रॅम 14 टिन, बाबा 54 प्श्रिमीयम चुविंग टोबॅको 200 ग्रॅम चे 14 टिन , 9) बाबा ब्लॅक डिलक्स चुविंग 1 किं ग्रॅ 48 टिन, 10) बाबा ब्लॅक टोबॅको 50 ग्रूम 350 ग्रॅम बॉटल 300 असा एकुण 11,99,180 किंमतीचा माला सह स्कॉर्पिओ वाहन अंदाजे 8,00,000 ₹ किंमतीचा असा एकुण 19,99,180 ₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व दोन आरोपी नामे- 1) आजिम आयुब उमाटे, वय 34 वर्षे, रा. कपिलनगर खाडगाव रोड, लातुर ता.जि. लातुर, 2)सज्जाद ईस्माईल सय्यद, वय 36 वर्षे, रा. औसा मोड, हाश्मीनगर औसा ता. औसा जि. लातुर याचे विरुध्द पोलीस ठाणे उमरगा येथे गुरनं 603/2023 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 188 सह अन्न व सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 26 (2) (आय), 26(2) (चार), 27 (3), (ई), 30(2अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक पुजरवाड करत आहे. सदर कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. निरीक्षक पारेकर, उपविभागीय कार्यालय उमरगा यांचे पथकाने केली.
अवैध मद्य विरोधी जिल्हा भरात 9 छापे.” पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली काल शुक्रवार दि.10.11.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 9 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 111 लि. गावठी दारु, असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4,12,230 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 9 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. मस्सा खं, ता. कळंब.जि.धाराशिव येथील-बप्पा उजण्या काळे, वय 60 वर्षे, हे 14.00 वा. सु. आपल्या राहात्या घराचे पाठीमागे अंदाजे 39,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव जप्त करण्यात आले. तर पारगाव, ता. वाशी जि. धाराशिव येथील- ताई शिवाजी पवार, वय 35 वर्षे, या 16.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 36,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व गावठी दारु जप्त करण्यात आली.
2) ढोकी पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. तावरजखेडा ता. जि. धाराशिव येथील-सिंधुबाई नागु राठोड, 2) दत्ता गंगाधर जाधव हे दोघे 09.05वा. सु. तावरजखेउा येथे लमाण तांडा आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 1,15,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व गावठी दारु जप्त करण्यात आली. तर तावरजखेडा ता. जि. धाराशिव येथील-निलावती व्यंकट पवार, 2)माणिक उमाजी पवार हे दोघे 09.20 वा. सु. तावरजखेउा येथे लमाण तांडा आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 1,26,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व गावठी दारु जप्त करण्यात आली. तर तावरजखेडा ता. जि. धाराशिव येथील-1) सुरेखा भास्कर पवार, 2) विमल विनायक पवार हे दोघे 09.50 वा. सु. तावरजखेउा येथे लमाण तांडा आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 86,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व गावठी दारु जप्त करण्यात आली
3) वाशी पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात कराळी, ता. उमरगा जि. धाराशिव येथील- काशिनाथ वसंत मंडले, वय 44 वर्षे हे 18.00 वा. सु. मुळजतांडा जवळ कराळी शिवारात ता. उमरगा येथे अंदाजे 930 ₹किंमतीच्या गावइी दारु 11 लि. व देशी विदेशी दारुच्या 11 बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर पेठसांगवी, ता. लोहारा जि. धाराशिव येथील- अफसर मेहताब मुजावर, वय 30 वर्षे हे 17.30 वा. सु. बलसुर येथे माउली बिराजदार यांचे उध्दव धाबृयाचे पाठीमागे अंदाजे 4,200 ₹किंमतीची गावठी दारु जप्त करण्यात आली.
4) वाशी पो.ठा. च्या पथकाने 2 छापे टाकले. यात इंदापूर रोड ता. वाशी जि. धाराशिव येथील- संगीता नारायण शिंदे, वय 26 वर्षे हे 18.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 2,500 ₹ किंमतीची गावठी दारु 30 लि. जप्त करण्यात आली. तर यात इंदापूर, ता. वाशी जि. धाराशिव येथील- मंगल धनु शिंदे, वय 38 वर्षे या 17.40 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 2,600 ₹ किंमतीची गावठी दारु 30 लि. जप्त करण्यात आली.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी