August 9, 2025

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कामगारासोबत साजरी केली दिवाळी

  • लातूर – दि.११.११.२०२३ रोजी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच कामगारांसोबत संस्था पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आणि कार्यालय प्रमुख यांनी दिवाळी साजरी केली.
    यावेळी शफिक चांद शेख, मुख्तार चांद शेख, माऊली, अलीम, जमीर, गौरव, वसीम, रियाज, अझहर आणि आयाज यांचा प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई आणि उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. राजकुमार लखादिवे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
    या उपक्रमाबद्दल उपस्थित सर्व कामगारांनी संस्था पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आणि कार्यालय प्रमुखाचे मनःपूर्वक आभार मानून सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य प्रा.संजय पवार, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
    तसेच दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सामुहिक बैठक घेऊन त्यांना प्रशासनामार्फत हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
    त्यानंतर दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर अप्पा मल्लिकार्जुन अप्पा बिडवे आणि ज्येष्ठ संचालक अॅड. श्रीकांत अप्पा उटगे यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.
    यावेळी उपस्थित सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संस्था पदाधिकारी व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानून दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!