कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोहा शाखा कळंबचे मुख्य व्यवस्थापक फुलचंद (अण्णा ) मडके यांच्या वाढदिवसानिमित्त मल्टीस्टेट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोहेकर उद्योग समूह व मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंत ( तात्या ) मडके यांनी फुलचंद अण्णा मडके यांचा शाल,बुके व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले. सत्कारमूर्ती फुलचंद (अण्णा ) मडके यांनी 73 वय वर्ष असताना देखील आपल्या कार्य कुशल नियोजनातून व व्यवस्थापनातून तत्पर सेवेतून मल्टीस्टेटची ओळख निर्माण केली आहे.या सत्कार प्रसंगी मल्टीस्टेटचे ऑडिटर माणिकराव अरकडे,शेतकरी सभासद शिवाजीराव काळे,प्रमोद मडके, इरफान शेख,राहुल मडके, बाळासाहेब उमाप,माधवसिंग राजपूत,रोहिणी कवडे,योगेश मुळे,अनिकेत मडके, कोळपे,सोमनाथ काथमांडे, श्रद्धा जोशी,तुषार साठे यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले