कळंब ( माधवसिंग राजपूत ) – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती विचार संवर्धन महोत्सव अंतर्गत कळंब येथे पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन संमेलन दिनांक ११ व१२ एप्रिल रोजी नगरपरिषद संस्कृती सभागृह मेन रोड कळंब येथे संपन्न होत असून संमेलन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस, उद्घाटक म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा मतदार संघ,स्वागत अध्यक्ष आमदार कैलास घाडगे पाटील धाराशिव -कळंब मतदारसंघ,कार्याध्यक्ष डॉ.संजय कांबळे हे असून समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोकराव मोहेकर सचिव ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम काळे शिक्षक मतदार संघ छत्रपती संभाजीनगर विभाग हे असून दिनांक ११ एप्रिल रोजी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडीने होणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही दिंडी संमेलन स्थळी पोहोचणार आहे,दिंडी पालखीमध्ये भारताचे संविधान,संत तुकाराम गाथा,शेतकऱ्याचा आसूड ग्रंथ हे ग्रंथ असणार आहेत.या दिंडीचे नेतृत्व जिजाऊ ब्रिगेड,रमाई ब्रिगेड ,सावित्रीबाई फुले महिला ब्रिगेड हे करणार असून ग्रंथदिंडी कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न होईल.या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक या वर्तमानपत्र शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत.यानिमित्त पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या दोन पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहेत.या पत्रकार परिषदेत पुरस्कार प्राप्त पत्रकार उन्मेष पाटील दैनिक लोकमत कळंब,अविनाश काळे दै.सकाळ उमरगा तसेच या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.संमेलन स्थळास प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे नाव तसेच जगद्गुरु संत तुकोबाराय विचारपीठ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रवेशद्वार असणार आहे.या साहित्य संमेलनात दोन दिवस विचाराची शिदोरी मिळणार आहे. परिवर्तनवादी विचारांच्या कवींचे संमेलन तसेच परिसंवाद — विषय छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुस्लिम विषय धोरण व वर्तमान ,भारतीय संविधानाची ७५ वर्ष आणि आव्हाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युगंधर व्यक्तिमत्व,धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही पूरक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या दोन दिवस वेगवेगळ्या सत्रात आयोजित या परिसंवादात महाराष्ट्र राज्यातील नामवंत साहित्यिक व विचारवंत आपले विचार व्यक्त करणार आहेत.याप्रसंगी डॉ. संजय कांबळे यांनी संमेलन घेण्याविषयीची भूमिका स्पष्ट करताना साहित्य संमेलन घेण्यामागचा उद्देश कळंब शहराला सांस्कृतिक वारसा निर्माण करण्यासाठी यापूर्वी अस्मितादर्श साहित्य संमेलन व आंबेडकरी साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजन करून परिवर्तनाच्या दिशेने समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे.त्याचाच एक भाग म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन आम्ही घेत आहोत. अलीकडच्या काळामध्ये जातीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न होत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष विचाराना बगल देऊन १८ पगड मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आहे.हे न सांगता शिवाजी महाराज दुसऱ्या धर्माच्या विरोधात होते हे दाखवण्याचा खोडसाळ प्रयत्न होत आहे व संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झालेली आहेत.या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सारखेच आहेत यामुळे आम्ही महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये महाराजांच्या विचाराच्या माध्यमातून देश जोडण्याचे काम करीत आहोत.त्यासाठी हे संमेलन आहे असे सांगून संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.संजय कांबळे यांनी केले. या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे ,रमेश बोर्डेकर,महादेव महाराज अडसूळ,सी.आर.घाडगे,भास्कर सोनवणे, मुसद्देक काझी, प्रा.जालिंदर लोहकरे ,माधवसिंग राजपूत ,बालाजी अडसूळ, परमेश्वर पालकर,सचिन क्षिरसागर,संदीप कोकाटे , आश्रुबा कोठावळे यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले