August 9, 2025

विद्याभवन येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव व चौथी वर्गातील विद्यार्थांना निरोप

  • कळंब- ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर, कळंब शाळेत “गुढी पाडवा प्रवेश वाढवा ” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी प्रवेशोत्सव व चौथी वर्गातील विद्यार्थांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड.मंदार मुळीक, उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा,मुख्याध्यापक सुभाष लाटे व गावातील पालक,नागरिक, लोकप्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
    सर्व नवागतांचे स्वागत शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी साखरहार व पुष्पगुच्छ देऊन केले.तसेच चौथीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.सन 2025-26 पासुन नवीन अभ्यासक्रमानुसार सीबीएससीई पॅटर्न या वर्षी शाळेत चालू केला आहे.तरी नवीन विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले.
error: Content is protected !!