कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखालील कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील छत्रपती संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा मिळवले असून शिष्यवृत्तीधारक दोन विद्यार्थिनी झाल्या आहेत. कु.भावना श्रीकांत पवार व कु. श्रावणी संदिप शिंदे या विद्यार्थीनींची राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले असुन या दोन्ही विद्यार्थीनींची शिष्यवृत्ती धारक म्हणून निवड झाली आहे. त्यांना इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दर वर्षी 12000 शिष्यवृती मिळणार आहे या बद्ल संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर,शालेय समितीचे अध्यक्ष तथा संचालक तात्यासाहेब पाटील,संस्थेचे संचालक भगवानराव लोमटे, मुख्याधापक संभाजी गिड्डे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत पवार,उपाध्यक्ष गजेंद्र समुद्रे,सहशिक्षक धनंजय डोळस,सूर्यकांत लोहार,अशोक सावंत,श्रीकांत तांबारे,पृथ्वीराज लोमटे ,उस्मान शेख,ओम ढिकले व ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले आहे.
More Stories
छत्रपती संभाजी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
छत्रपती संभाजी विद्यालयात शिष्यवृत्ती धारक विद्यार्थांचा सत्कार
छत्रपती संभाजी विद्यालयात गटशिक्षणाधिकारी यांची भेट