कळंब – माधवसिंग राजपूत हे अभ्यासू,सातत्यपूर्ण आणि संयमी व्यक्तिमत्व असणारे सच्चा पत्रकार असून सामाजिक भान जोपासणारे तळमळीचे कार्यकर्ते आहेत.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची समाजास आणि आपणास खूप गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले.
साक्षी कोचिंग क्लासेसच्या हॉलमध्ये प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सा.साक्षी पावनज्योतचे उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या अध्यक्षतेखाली अभिष्टचिंतन सोहळा दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता मोठ्या वैचारिक थाटामाटात संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसूळ,संस्कृतचे तज्ञ शिक्षक कवडे महाराज,माजी नगरसेवक सुनील गायकवाड,समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भंडारे,शिंदे,दत्ता शेवडे,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,संघर्ष घोडके,प्रबुध्द रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके आदींनी माधवसिंग राजपूत यांचे कार्य विशद करून पुढील वाटचालीस आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.या सत्कारास उत्तर देतानी माधवसिंग राजपूत यांनी मी वेगळे असे काही केले नसून सर्वांसोबतच सामाजिक आणि पत्रकारितेचे काम करत असून माझ्या सवंगड्यांनी सत्कार केल्याने मला प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले.या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके यांनी केले तर आभार ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू ताटे यांनी मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले