कोथळा – जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोथळा येथील चि.शौर्य महेंद्र रणदिवे या विद्यार्थ्याची सन २०२४-२५ मध्ये घेतलेल्या परीक्षेतून तुळजापूर येथील नवोदय विद्यालय मध्ये निवड झाली आहे. या यशानिमित्त शौर्य रणदिवे याचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक गुंठाळ व श्रीमती.चव्हाण मॅडम, त्याचे पालक श्रीमती.गायकवाड यांचा शाळेच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, मुख्याध्यापक विष्णू ढगे आणि शिक्षक वृंद काळे,जाधव,बोरकर,श्रीमती अडसूळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड