कन्हेरवाडी – कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या नवोदय प्रवेश परीक्षेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी शाळेतील कुमारी जगताप सिद्धी सुंदर व कुमार वाघमोडे यशराज परमेश्वर हे दोन विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश पात्र झाले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.शाळेचे मुख्याध्यापक भंडारे बी.एन.यांच्या हस्ते दोघांचेही अभिनंदन करून यथेच्छ सत्कार करण्यात आला.तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विद्यार्थी प्रिय होतकरू शिक्षक दीपक चाळक,आशा कंगळे,परमेश्वर वाघमोडे ,नारायण झोरी व पहिली ते चौथीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षिका मंगल गाढवे या सर्वांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थिनीचे आजोबा भिमराव जगताप, चुलते धनंजय जगताप, शाळेतील शिक्षक राजेश काळे व हंडीबाग सुषमा हे सर्व उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड