June 23, 2025

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचे ग्रामीण भागात शिक्षणाद्वारे उल्लेखनीय कार्य

  • कळंब – संत नामदेव महाराजांच्या “ज्ञानदीप लावू जगी” ह्या ऊक्तीप्रमाणेच शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विविध ठिकाणी शाळेची स्थापना करून ग्रामीण भागातील शिक्षणाच्या प्रसारासाठी भरीव योगदान दिले आहे.शिक्षण हे प्रत्येकासाठी उपलब्ध असावे या ध्येयाने प्रेरित होत,त्यांनी विविध ठिकाणी शाळा सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
    शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी शिक्षण क्षेत्रातील अपूर्व योगदान देत अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला.त्यांनी स्थापन केलेल्या शाळांमुळे गरीब व वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्णसंधी मिळाली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन यशस्वी जीवन जगत आहेत.
    त्यांच्या शिक्षणप्रेमी आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उभारलेल्या ह्या शाळा केवळ शिक्षण देण्याचे केंद्र नाहीत,तर त्या संस्कार,मूल्ये आणि समर्पणाचे प्रतीक ठरल्या आहेत.ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत त्यांनी घडवलेले योगदान हे प्रेरणादायी असून, त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने दि.२७ मार्च २०२५ वार गुरुवारी रोजी मराठवाड्यातील विविध ठिकाणी कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन करण्यात आले.

  • शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथील गुरुजींच्या पुतळ्याचे प्रा.डॉ.श्रीकांत भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,संचालक प्रा.सतिश मडके आदींची उपस्थिती होती.

  • ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरूजींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
    यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर, प्रा.सुनील साबळे,प्रा.दिग्विजय पाटील,प्रा.नवनाथ करंजकर, भिसे,सतिश मडके,जनार्दन भामरे आदी जण उपस्थित होते.

  • ज्ञानोद्योग विद्यालय,येरमाळा येथे संस्थापक,अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेची पूजन मुख्याध्यापक पौळ एस.एल,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

  • जय भवानी विद्यालय पारा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक एन.बी. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  • संभाजी विद्यालय,पिंपळगाव (लिंगी) येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी ( आण्णा ) यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी प्रशालेचे शिक्षक संतोष ढोले,संतोष बोडके, सुहास जगताप,शिक्षकेत्तर शिवराम शिंदे,लहू फुरडे आदी उपस्थित होते.

  • विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानिमित्त प्रशालेचे उपमुख्याध्यापक मायाचारी व्ही एस,पर्यवेक्षक अनिगुंठे जगदेवी,पाटील एस.एस,सागर व्ही.आर,सुरज मडके,नलावडे डी.बी हे उपस्थित होते.

  • विद्यामंदिर हायस्कूल.आष्टा.ता. भूम येथे शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी,मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

  • ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी ( आण्णा ) यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी प्रशालेचे सहशिक्षक कमलाकर शेवाळे,श्रीमती पांचाळ उषा,श्रीमती सोनवणे नीता,जाधव पांडुरंग आदींची उपस्थित होते
error: Content is protected !!