August 8, 2025

कळंब उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट व आढावा बैठक

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी उपजिल्हा रुग्णालय,कळंब येथे दि.२६ मार्च २०२५ रोजी भेट देऊन बाह्य रुग्ण विभाग (OPD) आणि अंतर रुग्ण विभाग (IPD) ची पाहणी केली.यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून वैद्यकीय अधीक्षकांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
    यावेळी मंजूर १०० बेड इमारतीच्या जागेच्या संदर्भात कळंब शहर विकास कृती संघर्ष समिती यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.जुना सरकारी दवाखाना आणि जिल्हा परिषद शाळा परिसराची पाहणी करून,सदर प्रस्ताव सहाय्यक अभियंता,बांधकाम उपविभाग,कळंब यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
    या दौर्‍यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.एम.यू.शेळके,डॉ.पुरुषोत्तम पाटील तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!