कळंब (साक्षी पावन ज्योत वृत्तसेवा ) – सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या एकसष्टी निमित्त पर्याय सामाजिक संस्था,सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट आणि अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज गौरव निबंध स्पर्धा कळंब व वाशी तालुक्यातील ५७ शाळेतील प्राथमिक व माध्यमिक गटातून घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक शाळेतून दोन्ही गटातून प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक विजेत्यांना बक्षीस वितरण दिनांक २७ मार्च २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता पर्याय संस्था,हासेगाव कळंब येथे विश्वनाथ (अण्णा) तोडकर, सुभाष तगारे, कळंब तहसीलदार हेमंत ढोकले, कळंब गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते,वाशी गटशिक्षणाधिकारी घोलप,कळंब पोलीस निरीक्षक रवी सानप, मुख्याध्यापक संतोष भोजने, विलास घोडगे,नेताजी भालेराव, ऋषिकेश तोडकर आदी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रम समन्वयक आश्रुबा गायकवाड यांनी केले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले