August 8, 2025

ज्येष्ठांशी संवादा अभावी तरुण्य नैराश्येत – सौरभ खेडेकर

  • कळंब (महेश फाटक ) – घरातील ज्येष्ठांशी तरुणांचा संवाद नसल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी तरुण नैराश्येत जात असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी मराठा समाज जोडो अभियानाच्या जिजाऊ रथयात्रेच्या स्वागत सभे प्रसंगी व्यक्त केले.
    पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनात दि.१८ मार्च ते १ मे २०२५ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जोडो अभियानांतर्गत जिजाऊ रथ यात्रा सुरू आहे.पश्चिम महाराष्ट्र करून दिनांक २६ मार्च रोजी मराठवाड्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानीचे दर्शन घेऊन धाराशिव करून येथे सायंकाळी ६.०० वाजता या रथयात्रेचे आगमन झाले.
    विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,माता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिजाऊ चौकात या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात येऊन जाहीर सभा संपन्न झाली. पुढे बोलतानी सौरव खेडेकर म्हणाले की,मराठा चळवळ फक्त आरक्षणाभोवती फिरत असून खाजगीकरण-जागतीकरणामुळे नोकऱ्याच संपुष्टात येत असल्याने तरुणांनी आता उद्योग धंद्याकडे वळले पाहिजे. मराठवाड्यात मोठे उद्योग नसल्याने तरुण पुणे-मुंबईकडे जात आहे.

  • संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सौरव खेडेकर यांचे विचार मंचावर सा.साक्षी पावन ज्योत परिवाराच्या वतीने कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांनी सा.साक्षी पावनज्योतचा अंक आणि प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके लिखित “विरंगुळा” हे पथनाट्य व अग्रलेखांचा संग्रह असलेला पुस्तक देऊन सन्मान करण्यात आले.
  • यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या ताई बोराडे,आशा मोरजकर,संभाजी ब्रिगेडचे तनपुरे आदींनी संभाजी ब्रिगेडचे ध्येय धोरणे स्पष्ट केली. तर प्रस्तावनेतून संदीप शेंडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील मावळे सोबतीला घेतले असल्याने संभाजी ब्रिगेड सुद्धा मराठा समाज जोडो अभियानातून जिजाऊ रथ यात्रेद्वारे आठरा पगड जातीच्या मावळ्यांना जोडण्याचे काम करत असल्याचे सांगितले.या सभेचे सूत्रसंचालन प्राचार्य जगदीश गवळी यांनी केले तर अतुल गायकवाड यांनी आभार मानले.
error: Content is protected !!