August 8, 2025

विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर संपन्न

  • कळंब – तालुक्यातील संतश्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर‎ नुकतेच संपन्न झाले.या समारोप समारंभ प्रसंगी‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे गटनिदेशक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी शामकांत डोंगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपकोषागार अधिकारी बाबासाहेब गाडे, जलसंधारण विभागाचे निखिल कानडे,संस्था व्यवस्थापण सदस्य गोविंद करडे होते.आपल्या देशाचा‎ आर्थिक,सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक‎ विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना‎ उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते.देशातील‎ युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील‎ राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होते‎ असे मत बाबासाहेब गाडे यांनी व्यक्त केले.
    विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन मोहाचे उपसरपंच बशारतनवाब मोमीन आणि उच्चशिक्षित शेतकरी सुनील मडके यांच्या हस्ते करण्यात आले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धाराशिव जिल्हाकार्याध्यक्ष प्रा.अरविंद शिंदे आणि बुवाबाजी संघर्ष समितीचे धाराशिव जिल्हासचिव प्रा. बालाजी राऊत यांचे अंधश्रद्धा विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सायबर सिक्युरिटी या विषयावर गायत्री कॉम्प्युटरचे संचालक श्याम जाधवर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.स्वयंसेवक प्रशिक्षणार्थी यांनी संस्थेत श्रमदानातून रेन वॉटर हार्वेस्टिंग, वस्तीगृह स्वच्छता केली आहे. जिल्हास्तरीय आणि विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करणारे आणि जिल्हा स्तरीय तंत्रप्रदर्शन मध्ये यशस्वी प्रशिक्षणार्थी यांचा गौरव चषक आणि प्रमाणपत्र देऊन यावेळी करण्यात आला.

  • राष्ट्रीय सेवा‎ योजना ही संकल्पना सांगताना मोहाचे उपसरपंच बशारतनवाब मोमीन यांनी‎ म्हटले की सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या‎ आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात.‎विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर‎ व्हावा,तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी,‎युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा,या हेतूने‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर‎ राबविल्या जातात.
    शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ‎ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा‎ योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती‎ वाढताना दिसून येते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत‎ असताना विश्वनाथ पाटील यांनी‎ सात दिवसांमध्ये केलेल्या कार्याचा लेखाजोखा‎ मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटील व आभार धैर्यशील मडके यांनी‎ मानले.
    कार्यक्रमास संस्थेतील सर्व‎ कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.‎

error: Content is protected !!