धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला.जल व भूमी व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.इंंग्रजी विभागातील प्रा.डाॅ.गोविंद कोकणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डाॅ.नितीन पाटील प्रमुख अतिथी मह्णुन उपस्थित होते. रसायनशास्त्र विभागप्रमुख डाॅ. किशन हावळ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघश्याम पाटील, डाॅ. जितेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.डाॅ. नितीन पाटील यांनी पाण्याचे अलौकिक महत्व स्पष्ट केले. पाणी हे सर्वांसाठी आहे. जागतिक वनदिन,जागतिक जलदिन असे कार्यक्रम लोकांपर्यंत पाण्याचे महत्व पोहोचविण्यासाठी, जनजागृती निर्माण करण्यासाठी केले जात असतात.1993 पासुन जागतिक जलदिन साजरा करण्यात येतो. Conservation of Glaciers ही थीम आहे.पाणी किती पडते. भारतात एका व्यक्तीला 40 लिटर लागते,शहरात 100 लिटर आणि मोठया शहरात 250 लिटर पाणी लागते. गंगोत्री आणि यमुनोत्री या हिमनदया आहेत.अ॓सिड रेन चा प्राॅब्लेम प्रदुषणामुळे आहे.प्रत्येक व्यक्तीला पुरेसे स्वच्छ पेयजल मिळाले पाहिजे.पाणी पातळी कमी झाली आहे,पाणी का मुरत नाही. माती मध्ये पाणी धारण करण्याची क्षमता जास्त आहे. माती संवर्धन केले तर जल संवर्धन आपोआप होईल. भारतात ग्रामीण भागात एका व्यक्तीला एका दिवशी 40 लिटर पाणी लागते,शहरात 100 लिटर पाणी लागते,मोठया शहरात 250 लिटर पाणी लागते.गंगोत्री आणि यमुनोत्री या हिमनदया आहेत.असिड रेन चा प्रश्न प्रदुषणामुळे निर्माण झाला आहे. प्रत्येक व्यक्तीला पुरेसे पेयजल मिळाले पाहिजे.पाणी पातळी कमी झाली आहे,पाणी का मुरत नाही.मातीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता जास्त आहे. माती संवर्धन केले तर जल संवर्धन आपोआप होईल. पाणलोट क्षेत्रामध्ये वनीकरण, तसेच गवताचे आच्छादन केल्यास बाष्पीभवनाचा वेग कमी होईल,भुजलाची पातळी वाढण्यास मदत होईल,असे प्रतिपादन त्यांनी केले. समारंभाचे अध्यक्ष प्रा.डाॅ. जी.डी.कोकणे यांनी जागतिक जलदिन साजरा करण्याच्या उद्देश्या विषयी मार्गदर्शन केले. या वर्षीची थीम ” हिमनदयांचे संवर्धन “ही आहे.स्वच्छ आणि ताजे पाणी उपलब्ध करण्यात हिमनदयांची महत्वाची भूमिका आहे.वातावरण नियमित करणे, यामध्ये हिमनदया महत्वपूर्ण भुमिका निभावतात.हिमनदया परिसंस्थेचा महत्वाचा घटक आहेत. हिमनदया वेगात नष्ट होत आहेत.भावी पिढयांसाठी शाश्वत स्वच्छ व ताजे पाणी उपलब्ध करण्यासाठी व आरोग्य संपन्न जीवनासाठी हिमनदयांचे संरक्षण केले पाहिजे.पाणी आहे,तर जीवन आहे. जल संवर्धन केले तर पाण्याचा प्रश्न सुटेल. स्वच्छ पाणी सर्वांना मिळाले,तर रोग होणार नाहीत.शाश्वत विकासात्मक प्रक्रियामध्ये सर्वांना स्वच्छ व ताजे पाणी उपलब्ध करुण देणे महत्वपूर्ण आहे,असे विचार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.अभिजित पडवळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.डाॅ.मेघश्याम पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध विभागातील प्राध्यापक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला