March 26, 2026

प्रवेश दिंडी व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

  • पिंपळगाव (डोळा) (राजेंद्र बारगुले)–दिनांक २१ मार्च २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (डोळा) ता.कळंब जिल्हा धाराशिव येथे इयत्ता पहिली प्रवेश सन २०२५-२६ साठी गाव व वस्त्यांवर घरोघरी जावून प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.प्रवेश पात्र विद्यार्थी संख्या एकूण दहा अशी निश्चित करण्यात आली असून त्यांचे प्रवेश अर्ज पुर्ण करण्यात आले आहेत.सदरील विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव डोळा येथे १००% प्रवेशीत करण्यासाठी गावात प्रवेश दिंडी काढण्यात आली.दिंडी साठी ट्रॅक्टर आकर्षक सजावट करुन नवोदित विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम व गाण्यावर नृत्य सादर करून शिक्षण व जिल्हा परिषद शाळा बाबतीत नागरिक मध्ये जागृती निर्माण करून गावात उत्साही वातावरण तयार केले आहे.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कालिदास दत्त व ईतर सदस्य,गावातील मान्यवर,शिक्षण प्रेमी नागरिक व पालक उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाऊलाची नोंद घेऊन.फुलांचा वर्षाव करत पालक,विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या व त्यांचे स्वागत केले.यावेळी प्रवेश दिंडीची सांगता करताना शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रणदिवे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव डोळा शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवत असलेले विविध उपक्रम सांगून विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक विशाल गंभीरे तर आभार लक्ष्मीकांत रामढवे यांनी केले.खाउ वाटप करून प्रवेशोत्सवाची सांगता करण्यात आली.सदरील कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक बालाजी पवार,श्रीमती शिंदे व श्रीमती कोरे यांचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!