लातूर – बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ पुज्य भिक्खु संघाच्या प्रमुख उपस्थितीत व पुज्य भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या नेतृत्वात तीन दिवसीय धरणे आंदोलनाचा समारोप जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देऊन करण्यात आला. या प्रसंगी महाबोधी १९४९ हा जाचक कायदा रद्द करून नवीन सुधारित कायदा बनवून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावे. या प्रमुख मागणीचे निवेदन पुज्य भिक्खु संघाच्या उपस्थितीत निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तीन दिवसीय धरणे आंदोलनाला व्ही.एस.पॅन्थर,भिम आर्मी, भीमराज संघटना,लोकप्रहार संघटना,शाक्य संघ,माता भीमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटना युवा संघटन, भारतीय बौध्द महासभा,त्रिरत्न बौद्ध महासंघ,लातूर शहर पूर्व भाग नागरी हक्क कृती समिती, प्रतिज्ञा मागासवर्गीय महिला मंडळ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट फोरम,बहुजन समाज पक्ष,वंचित बहुजन आघाडी आदी संघटनेने पाठींबा दिला आहे. यावेळी पु.भिक्खु प्रा.डॉ. यशकास्यपायन महाथेरो,पु. भिक्खु महाविरो थेरो,पु.भिक्खु पय्यानंद थेरो,पु.भिक्खु विनय थेरो,पु.भिक्खु धम्मसार थेरो,भंते बुद्धशील,भिक्खुनी धम्मकरुणा ई.भिक्खु संघ उपस्थित होते. निवेदनावर सर्व बौद्ध बांधव भगिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यात प्रामुख्याने केशव कांबळे,ॲड.आण्णाराव पाटील,चंद्रकांत चिकटे,मोहन माने,अनंत लांडगे, बसवंतप्पा उबाळे,इंजि.एम.एन.गायकवाड,प्रा.यु.डी. गायकवाड,प्रा.रामराव गवळी,भीमराव चौदंते,अशोक कांबळे, विश्वाभर भोसले,डी.एस.नरसिंगे,विश्वनाथ आल्टे,कुमार सोनकांबळे,डॉ.विजय अजनीकर,रवि गायकवाड, विनय जाकते,ऍड.अतिश चिकटे, अजय सूर्यवंशी,अक्षय धावारे, अनिरुद्ध बनसोडे,सुशील चिकटे, उदय सोनवणे,प्रा.प्रवीण कांबळे,सुनील कांबळे,मिलिंद धावारे,आशा चिकटे,शिला वाघमारे,शोभा सोनकांबळे,निलूबाई कांबळे, ललिता गायकवाड,छाया उबाळे, सत्यभामा रोंगे,रेखा सुरवसे, सुजाता अजनीकर यांच्या सह शेकडो बांधव भगिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या तीन दिवसीय आंदोलनात हजारो उपासक उपासिकांनी हजर राहून आंदोलन यशस्वी केले.आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजु कांबळे,करण ओव्हाळ,गोविंद कांबळे,ज्योती राम लामतुरे आदीनी परिश्रम घेतले.
More Stories
आपल्या व्यवसायावर श्रद्धा ठेवा, पदानंतर ओळखणारी माणसेच खरी संपत्ती – डॉ.राजेश गोरे
मध्यवर्ती बसस्थानक,जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर
“सदा सर्वकाळ शिक्षकांच्या अडी–अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिन” – शिक्षक आमदार विक्रम काळे