कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक राजाभाऊ माळी हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.पांडुरंग भवर, कार्याध्यक्ष श्रीधर भवर, सहसचिव भागवत सुरवसे,डॉ . गोरे,डॉ.वारे हे उपस्थित होते. राजाभाऊ माळी यांचा सपत्नीक विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.मीनाक्षी शिंदे- भवर यांनी राजाभाऊ माळी यांच्या विषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विद्यालय यांचे सूर्यभान सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन बप्पा शिंदे यांनी मानले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले