August 8, 2025

संत विचार भक्ती मार्गाचा दीपस्तंभ – सुनीतादेवी अडसूळ महाराज

  • पिंपळगाव (डोळा) (महेश फाटक यांजकडून ) – अभंगाच्या गोडव्यातून ईश्वर प्रेम,निस्वार्थ सेवा आणि साधनेचे महत्त्व आधुरेखीत करतानी,लक्ष्मी वल्लभा दिनानाथा,पद्म लाभा सुख वसे तुझे पायी,मज ढेवी तये ठायी या संत तुकारामाच्या अभंगाच्या ओवीतून भगवंतांच्या चरणी पूर्ण समर्पण केल्यानेच खरी शांती आणि आनंद मिळतो. संत साहित्य हा केवळ वांड्मय नाही,तर तो भक्तीचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे.असे ठोस प्रतिपादन ह.भ.प सुनीतादेवी अडसूळ महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसरे पुष्प गुंफताना आपल्या कीर्तनातून केले.
    श्री संतयोगी साधुबुवा महाराज समाधी, पिंपळगाव (डोळा) मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक २० फेब्रुवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान साधुबुवा महाराज मंदिर विश्वस्त व गावकरी मंडळाच्या वतीने आयोजित सप्ताहामध्ये उमेश मिटकरी महाराज,रमेश हिरे महाराज,बापू जोशी महाराज,दत्ता आंबिरकर महाराज,आप्पा जावळे महाराज, बाळासाहेब बोधले महाराज,
    श्रीनिवास जगताप महाराज आदींची कीर्तन सेवा होत आहे. या सप्ताहासाठी पिंपळगाव पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असून कीर्तन सेवेतून संतविचाराचा प्रसार होत असून बालविवाह, अंधश्रद्धा,व्यसनमुक्ती आणि आत्महत्येवर प्रबोधन होत असल्याने गेल्या २९ वर्षापासून या सप्ताहाचे आयोजन होत असल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण दशवंत यांनी सांगितले.
error: Content is protected !!