कळंब- कळंब येथे दि.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक संघटनेचा विस्तार वाढविणे बाबत घेण्यात आली.या बैठकीत वरील विषयांकीत प्रश्न चर्चेत घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामधे असे ठरले की,फुले, शाहू,आंबेडकर,आण्णा भाऊ,या विचार धारेवर कार्य करणारे तसेच महा ई सेवेच्या माध्यमातून सर्व स्तरातील गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीने झटणारे कार्यकर्ते बाबासाहेब टोपे यांच्या नेतृत्वाखाली कळंब तालुक्यातील गोरगरिबांना न्याय मिळावा,त्यासाठी कळंब तालुका अध्यक्ष पदांची धूरा देण्यात यावी,असे ठरले त्यानुसार बाबासाहेब टोपे रा.सावरगाव (पु),ता.कळंब जिल्हा धाराशिव यांची कळंब तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज,या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिमरत्न,प्रा.बी.बी.शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.या निवडीमुळे बाबासाहेब टोपे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
More Stories
कळंब नगर परिषदेच्या ७२ कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात विविध उपक्रमांची मेजवानी
डीजे-डॉल्बी मुक्त रामनवमीचा संकल्प;अध्यक्षपदी प्रसन्न हुलसुरकर यांची धुरा