कळंब – कसबे तडवळे येथे दिनांक २२,२३ फेब्रुवारी १९४१ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महार- मांग वतनदार परिषद घेतली होती.या ऐतिहासिक परिषदेचे स्मरण म्हणून संविधान अमृत महोत्सवीचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या एकसष्टी व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त ग्रामीण व पारंपारिक कलावंत परिषद दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कळंब येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत सर्व प्रकारच्या ग्रामीण व पारंपारिक कलावंताचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असून त्यांच्या समस्या शासन दरबारी लावून धरण्यात येणार आहेत.तरी ग्रामीण व पारंपारिक कलावंतानी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सचिव प्रा.अविनाश घोडके मो.नं.८३०८५४८६८४,सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ मो.नं.९१७२९७२४८२या नंबर वर नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रबुद्ध रंगभूमीचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी केले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले