कळंब – समाजासाठी सतत कार्यरत राहणे.याच सामाजिक जाणिवेतून दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी दिलीप गंभीरे यांनी आपला वाढदिवस संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांना काठी व उपरणे भेट देऊन ज्येष्ठा नागरिकासमवेत तर संत ज्ञानेश्वर मूकबधिर विद्यालय येथील मूकबधिर विद्यार्थ्याना फळे वाटप करून साजरा करण्यात आला.संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथील आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी दिलीप गंभीरे यांचे कुटुंब वारकरी संप्रदायातील असून ईटकुर या गावातील हरिनाम सप्ताहात अन्नदान सेवा देतात तसेच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना काठी व उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला आहे . ज्येष्ठांना काठी हा जीवन जगण्यासाठी महत्त्वपूर्ण आधार आहे असे सांगून समाजात ज्येष्ठांचा आदर व सन्मान झाला पाहिजे असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रा.अरविंद खांडके,कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, गुणवंत कामगार संघटनेचे प्रदेश सचिव अच्युतराव माने,नमस्ते धाराशिव साप्ताहिकाचे संपादक संदीप कोकाटे,बशीर पठाण वारकरी साहित्य परिषद महिला धाराशिव जिल्हाध्यक्षा ह.भ.प. सुनीतादेवी महाराज अडसूळ, शिवाजीराव डिकले,व भजनी मंडळ महिला पुरुष यांची उपस्थिती होती.याप्रसंगी भजनी मंडळाच्या वतीने गंभीरे यांचा फेटा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.संत ज्ञानेश्वर मूकबधिर विद्यालय कळंब येथे आयोजित कार्यक्रमात देधानोरा ता.कळंब येथील पत्रकार शिवाजी सावंत यांच्या वतीने, विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले.याप्रसंगी संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर,कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे,कळंबचे माजी नगरसेवक सतिश टोणगे,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,शिक्षक कवी पत्रकार अश्रुबा कोठावळे, छायाचित्रकार खादिम सय्यद व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.उपस्थितांनी दिलीपराव गंभीरे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “खऱ्या आनंदाची खरी चव स्वतःसाठी नव्हे,तर इतरांसाठी जगण्यात आहे,” असे सांगत त्यांनी समाजसेवेचा संदेश दिला.तर प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिलीप गंभीरे यांचा शाल ,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष साप्ताहिक साक्षी पावन ज्योतचे संपादक सुभाष द.घोडके , उपसंपादक माधवसिंग राजपूत,महादेव महाराज अडसूळ,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,प्रसिद्ध व्यापारी गौतम लोढा,शिक्षक राजेंद्र पवार,नवनाथ भंडारे,अविनाश घोडके यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले