August 8, 2025

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास साधण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन दिशादर्शक – महादेव भोसले

  • नळदुर्ग – जि.प.कन्या हायस्कूल नळदुर्ग ता.तुळजापूर येथे ७ फेब्रु २०२५ रोजी माता रमाई यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित स्नेहसंमेलनात पुढे बोलताना प्राचार्य भोसले म्हणाले की,मुलींनी माता रमाई,सावित्री यांचा वसा घेऊन उच्च शिक्षण घेतले पाहीजे.आपल्या सुप्त गुणांना ओळखून शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आपला सर्वांगिण विकास साधला पाहिजे.कन्या हायस्कूल क्रिडा,कला,स्पर्धा परीक्षा,सहल,सांस्कृतिक कार्यक्रमातुन मुलींना संधी तयार करत आहे याबद्ल मी मुख्याध्यापक व त्यांचा स्टाफ यांचे अभिनंदन करतो.श्रीमती. सुरेखा साळूंके,तुळजाभवानी विद्यामंदीर तुळजापूर यांनी मुलीना जिद्द व अभ्यास करुन यश संपादन करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी अॕड.डाॕ.प्रा.पोळे यांनी शाळेतील सर्व उपक्रमांचे कौतूक केले.विशेषतःसर्व शिक्षक मिळून दुरुन शाळेला येणाऱ्या मुलींना मोफत गाडीची व्यवस्था केली व जवळ पास वर्षभराचा प्रतीशिक्षक ५०००० रु.खर्च करत आहेत.ही विद्यार्थ्यांप्रती असलेली आस्था,तळमळ दिसून येते.मुलींनी हे जाणून खुप शिकले पाहिजे व पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे.
    या स्नेहसंमेलनासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम.राणी धनराज वाघमारे,पत्रकार दादासाहेब बनसोडे,केंद्र प्रमुख सत्तेश्वर जाधव,शा.व्य.सदस्य मीरा वाघमारे,अंजना चव्हाण व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस नाट्य,विनोदी बातम्या,ग्रुपडान्स,वैयक्तिक डान्स,लावणी समाज जागृतीपर बहारदार कार्यक्रम सादर केला.
    स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम.लीलावती कौरव,तसेच निर्मला गावीत,अश्विनी साळुंखे,प्रज्ञा कांबळे,मिलींद कुलकर्णी,दत्तात्रय सगर,हारुण आतार,अक्षय जगदाळे,चिदानंद स्वामी,रंजना हळदे आणि सिंधु थोरात यांचे योगदान लाभले.
error: Content is protected !!