नळदुर्ग – जिल्हा परिषद कन्या हायस्कूल नळदुर्ग ता.तुळजापूर या शाळेची शालेय व्यवस्थापन समिती निवड दि.२६ जुन २०२४ रोजी राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीदिनी करण्यात आली.प्रशालेमध्ये दि २६ रोजी पालकमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकांमधून एकमताने व्यवस्थापन समिती सदस्य निवडण्यात आले.या सदस्यामधून अध्यक्षपदासाठी ३ जण ईच्छूक होते.त्यांच्यामधून लोकशाही पध्दतीने मतदानाने श्रीमती राणी धनराज वाघमारे यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी संजय राठोड यांची बिनविरोध निवड झाली.तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अॕड प्रा डाॕ पोळेसर यांची तर सदस्य म्हणून श्रीमती अंजना चव्हाण ,मिरा वाघमारे,ज्योती माने,जोत्स्ना बनसोडे,राजगुरु, नवनाथ काळे,गोविंद राठोड,अल्ताफ बेग,कु.सुवर्णा बागडे,कु.प्राजक्ता होंडराव, शिक्षक प्रतिनिधी मिलींद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.ही संपूर्ण प्रक्रिया मुख्याध्यापक तथा सचिव कमलाकर गायकवाड यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.यासाठी केंद्रप्रमुख सत्तेश्वर जाधव,पत्रकार दादासाहेब बनसोडे सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास साधण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन दिशादर्शक – महादेव भोसले
शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराने डॉ.डि.एस.जाधव सन्मानित
मारुती बनसोडे यांची तुळजापूर तालुका बाल संरक्षण समिती सदस्य पदी निवड