कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात लिपीक अनिल बब्रुवान पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आ.विक्रम काळे म्हणाले,“मराठवाड्यातील पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची ज्ञान प्रसारक मंडळ ही एक अत्यंत नावाजलेली संस्था आहे, हे मी जवळून अनुभवले आहे, येथील प्रत्येक कर्मचारी हा आपले काम सेवाभाव जोपासून करतात.खरेतर एखादी संस्था कर्मचारी किती परिश्रम घेतात.त्यावर तिचे मोठेपण ठरत असते,त्यातील एक कर्मचारी म्हणजेच अनिल पवार त्यांनी अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेने काम केल आहे”, असे गौरवोद्गगार काढले. पुढे ते म्हणाले,“माणसाने केवळ आपली जबाबदारी किंवा नोकरी म्हणून काम न करता त्या पदावर आनंदाने काम केल्यास ते कार्य अधिक चांगले होते,त्यांनी प्रदीर्घ वर्ष सेवा केली,परंतु तक्रार अथवा कधीही न रागावता सचोटी आणि तळमळीने काम केल्यास त्या पदाला निश्चितच न्याय मिळत असतो”. प्रारंभीस कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रांगणात असलेल्या पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर मेघराज पंडीत (अध्यक्ष,राज्य अशासकीय महाविद्यालयीन व समुह विद्यापीठे शिक्षकेतर कर्मचारी संघटना,पुणे),संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, संचालक संजय भोसले,तात्या पाटील,प्रा.अंजलीताई मोहेकर, रमेशभाऊ मोहेकर,प्राचार्य डॉ. सुनिल पवार,उपप्राचार्य डॉ.के.डी.जाधव, प्रा.आप्पासाहेब मिटकरी यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.सुनिल पवार, प्रा.वसंत मडके,डॉ.दत्ता साकोळे, डॉ.दादाराव गुंडरे,प्रा.विलास आडसूळ,प्रा.संजय भोसले आदींनी आपली मनोगत व्यक्त केली.ह.भ.प. महादेव आडसूळ महाराज,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत, कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांनी सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अशासकीय कर्मचारी संघटना अध्यक्ष मेघराज पंडित यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले, “राज्यात शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सक्रीय असून अत्यंत प्रभावीपणे काम करणारी आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही,याची काळजी घेते. कर्मचाऱ्यांनी काम करतांना आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपली ओळख कामातून स्वतंत्रपणे निर्माण केली पाहिजे.संस्थेसाठी आपण भरभरून दिले पाहिजे. संघटना ही चांगल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभीच असते.नक्कीच कामात तरबेज असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. याची आम्हाला जाणीव आहे. पवार सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. “ यावेळी अध्यक्षीय समारोपात डॉ.अशोकराव मोहेकर म्हणाले, “ज्ञान प्रसारक मंडळ संस्था एक कुटुंब आहे,अनिल पवार यांनी संस्थेच्या कामकाज करताना संस्थेसाठी सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न केला.संस्थेतील विविध शाखा,त्यांचे कामकाज अधिकाधिक चांगले प्रामाणिक करण्याचा प्रयत्न केला.कधीही कोणावरही न रागावता नाही, ज्ञान प्रसारक मंडळाच्या मराठवाड्यात विविध शाखांत त्यांनी सव्वीस वर्षे सात महिने लिपिक म्हणून आपल्या आपुलकी,संयमी,मितभाषी आणि सहकार्य वृत्तीने संस्थेच्या प्रगतीस मोलाचे योगदान देऊन संस्थेच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे संस्था आणि विद्यार्थ्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या.” यावेळी अनिल पवार यांचे कुटुंबीय सुभाष पवार,पंडित पवार,बाळासाहेब पवार,विशाल पवार,अँड.अच्युत लोमटे, हरिभाऊ माळकर,योगेश,नितीन व निशिकांत मुळे,श्रीकांत पवार, डॉ.युवराज भिसे इ.जवळा (खु.) ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी उपस्थित होते.तसेच प्रा.डॉ.आर. व्ही. ताटीपामूल,प्रा.हेमंत चांदोरे, प्रा.डॉ.के.डबलू.पावडे,प्रा.रुपेश मानेकर,प्रा.किरण बारकुल,प्रा. सुशील जमाले, प्रा.शाहरुख शेख,प्रा.नितीन अंकुशराव,प्रा. जयवंत ढोले,प्रा.अनिल फाटक, अंकुश लोकरे,संभाजी गिडे, श्रीकांत पांचाळ, प्रा. झाडके, प्रा.संदीप देवकते,प्रा.एच.जे. काजी,राजभाऊ शिंदे,आदित्य मडके,चांगदेव खंदारे, अभिमन्यू हाके,तसेच संस्थेच्या शाखेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनिषा लिमकर,संगीता रूमणे, राज्यश्री भारती,सुरेखा आंबिरकर,प्रा.शिवकन्या मांडे, प्रा.सरस्वती वायभसे, प्रा.प्रणिता खोसे,प्रा.ज्योती उन्हाळे, उपस्थित होते.सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी तर सहायक ग्रंथपाल अरविंद शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष मोरे, दत्तात्रय वाळजकर,अमोल सुरवसे,ईकबाल शेख,मारुती केचे,आदित्य मडके,संदीप सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर