कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे माजी उपप्रचार्य तथा ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉ.डि.एस.जाधव यांना परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्यावतीने दिला जाणारा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी नळदुर्ग येथील सभागृहात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल (भाऊ) सुराणा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी राजश्री शाहू महाविद्यालय लातूरचे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ.सुरेश वाघमारे,डॉ.मिलिंद वाकोडे सेवानिवृत्त कार्यकारी अधिकारी खादी ग्रामोद्योग भारत सरकार,प्रा.राजा सोनकांबळे, एस.एन.डी.टी.महिला कॉलेज पुणे,माजी उपप्राचार्य ॲड.श्रीमती मैना भोसले सदस्य महाराष्ट्र राज्य बालकल्याण समिती धाराशिव,संयोजक मारुती बनसोडे,परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग,शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांची उपस्थिती होती. त्यांचे दैनिक एकमत या वर्तमानपत्रांमध्ये रविवार सप्तरंगी पुरवणीमध्ये वनौषधी सदर यात ४९० वनौषधी लेख प्रकाशित झालेले आहेत.तसेच सहा विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शना मुळे पी.एचडी.डिग्री मिळाली. त्यांचे वनस्पती शास्त्रामध्ये वीस संशोधन पेपर प्रकाशित आहेत. वेगवेगळ्या विषयावरती सहा पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. विविध जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये निरीक्षक म्हणून कार्य पाहिले आहे.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अनमोल आहे. या यशाबद्दल सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,संस्थेचे अध्यक्ष अनिल (बापू ) मोहेकर,संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब (आबा ) पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
More Stories
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास साधण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन दिशादर्शक – महादेव भोसले
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्रीमती राणी धनराज वाघमारे यांची निवड
मारुती बनसोडे यांची तुळजापूर तालुका बाल संरक्षण समिती सदस्य पदी निवड