June 20, 2025

कै.डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची जयंती उत्साहात साजरी

  • आष्टा (संघपाल सोनकांबळे ) – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूल येथे दि.४ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक,मंडळ बार्शीचे संस्थापक कै.डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची १२२ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाची सुरुवात डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर सहाय्यक शिक्षक शशिकांत मांजरे यांनी डॉ.मामासाहेब जगदाळे व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शैक्षणिक जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे भाषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी मामासाहेबांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शमय जीवनाचा प्रेरणादायी संदेश दिला.
    याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!