पिंपळगाव (डोळा ) – दि.३ फेब्रुवारी २०२५ वार सोमवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव डोळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांच्या मातांचा मेळावा तसेच हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येनी महिलांनी व मातांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवर मातांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील विद्यार्थिनींनी उपस्थित मातांचे स्वागतगीत गाऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक विशाल गंभीरे यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती स्वामी ताई,महाराष्ट्र राज्य फेडरेशन मुंबईच्या संचालिका श्रीमती आयोध्याबाई धस,तसेच सीआरपी मेंबर श्रीमती.उंदरे, गावातील ग्रामपंचायत सदस्य,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,अंगणवाडी ताई, व शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी उपस्थित्यांचे स्वागत शाळेच्या वतीने सहाय्यक शिक्षिका श्रीमती शिंदे आणि श्रीमती कोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी श्रीमती इखे आणि श्रीमती उंदरे मॅडम यांनी मातांना व विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केले.यानंतर उपस्थित माता पालक मेळाव्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रणदिवे यांनी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मातांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे.याबाबत वेगवेगळे व्यवहारिक उदाहरण देऊन मेळाव्यास उद्बोधन केले. याप्रसंगी महात्मा गांधी यांचे शिक्षण विषयक विचार “‘देशातील प्रत्येक घर ही शाळा आहे घरातील आई-वडील हे प्रथम गुरु आहेत “असे अनेक उदाहरणे देऊन व महापुरुषांचा संदर्भ सांगून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी मातांचे योगदान किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. मोबाईल व टीव्ही या साधनांचा विद्यार्थ्यांवरील दुष्परिणाम कसे होतात.मातांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या लेकरांना घडविण्यासाठी करावा.या नवीन बदलाची सुरुवात मातांनी आपल्या घरापासून करावी.असे भाऊक आव्हान केले. यानंतर शाळेमध्ये मातांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला .त्यानंतर मातांची संगीत खुर्ची स्पर्धा घेऊन विजेत्या प्रथम येणाऱ्या मातास शाळेच्या वतीने बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विशाल गंभीरे तर आभार प्रदर्शन रामढवे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरीत्या घडून आणण्यासाठी शाळेतील श्रीमती शिंदे,कोरे व बालाजी पवार,यांचे विशेष सहकार्य लाभले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
More Stories
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यानं इतर विद्यार्थी प्रेरित होतात – भागवतराव धस
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यानं इतर विद्यार्थी प्रेरित होतात – भागवतराव धस
अंबाबाई यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न