कळंब – शहरातील महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे निविदा स्तरावर असल्यामुळे सदरील प्रकल्प पुर्ण होईपर्यंत शहरातील रस्ते प्रकल्प/रस्ते बांधकामाची निविदा स्तरावरील/कार्यारंभ आदेश देण्यात आलेली सर्व कामे तात्काळ स्थगित करण्यात यावी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी कळंब, तहसीलदार कळंब,सचिव महाराष्ट्र राज्य या सर्वांना समक्ष भेटून कामासंदर्भात शासनाची जनतेची व शासनाची होणारी पैशाची हानी थांबवण्या संदर्भात निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी केली आहे. शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की,ज्या ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात येत असतील तर सदरील कामे ही पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतरच करण्यात यावीत व चालू असलेली रस्त्याची विकास कामे आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात यावीत जेणेकरून शासनाच्या निधीचा दुरूपयोग होणार नाही याची खातरजमा संबंधीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची राहील असे शासन निर्णयात नमुद आहे. कळंब शहरातील प्रस्तावित असलेल्या विकास कामाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही परंतु जनतेच्या टॅक्स च्या पैशाची उधळपट्टी योग्य नाही.कळंब शहरांमध्ये सध्या अंदाजे १५ कोटी रूपयाची विविध ठिकाणचे नवीन रस्ते तयार करण्याबाबतचे निमे विविध कार्यान्वित यंत्रणेमार्फत हाती घेण्यात आलेली आहेत.कळंब नगर परिषद कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब, सार्वजनिक बांधकाम विभाग कळंब यांचे मार्फत कळंब शहर नगरपरिषद हद्दिमधील रस्त्याची विकासकामे सदरील कामे पुर्ण होणार आहेत. सदरील कामे पुर्ण होताच अवघ्या काही महिन्यांमध्येच संदर्भ क्र.२ नुसारच्या निविदेनुसार पुन्हा नवीन तयार केलेले रस्ते कामाच्या अंदाजे १५ कोटीच्या निधीचा अपव्यय होत आहे असे आमचे मत झाले आहे.सदरील अपव्यय हा केवळ मुख्याधिकारी न.प.कळंब यांच्या दिरंगाईमुळे होत आहे. सदरील या घटनेमुळे कळंब शहरातील कळंब नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब,सार्वजनिक बांधकाम विभाग कळंब यांच्या मार्फत प्रस्तावित असलेल्या सध्या चालू असलेल्या नवीन रस्ते कामास तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याबाबतची कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारींची भेट घेऊन मागणी केली.यावर जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले